Goa Education Dainik Gomantak
Video

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Goa Government Primary School Uniform: सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गणवेश आणि रेनकोट खरेदीसाठी सरकारकडून प्रति विद्यार्थी १,१०० रुपये देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गणवेश आणि रेनकोट खरेदीसाठी सरकारकडून प्रति विद्यार्थी १,१०० रुपये देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे. इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीसाठी प्रत्येकी ५०० रुपये, तर गणवेशासाठी प्रत्येकी ६०० रुपये देण्यात येणार आहेत.

सर्व साहाय्यक शिक्षण निरीक्षक आणि सरकारी प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी १५ जुलैपर्यंत निधीची पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यांत ही रक्कम जमा करावी, असे निर्देश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिले आहेत. दरम्यान, पूर्वी सरकारी शाळांतील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांमार्फतच गणवेश आणि रेनकोट वितरित केले जात होते. मात्र, काही वर्षांपूर्वी सरकारने त्यासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यांत जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.

पसंतीनुसार खरेदी...

सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वी शाळांमार्फतच गणवेश आणि रेनकोट वितरित केले जात होते. मात्र, आता ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (डीबीटी) पद्धतीने ही रक्कम थेट पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे पालकांना आपल्या पसंतीनुसार गणवेश आणि रेनकोट खरेदी करता येत असून वितरणातील विलंबही टळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT