Vaman Prabhugaonkar Dainik Gomantak
Video

Margao: स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगांवकार अंतरले..

Vaman Prabhugaonkar Passed Away: प्रभुगावकर आणि या सत्याग्रहात सामील झालेले त्यांचे इतर सहकारी काणकोण येथील होते. मात्र, शिक्षणानिमित्त ते कारवार येथे असताना रामदास फेणे या शिक्षकामुळे त्यांचा गोवा मुक्ती लढ्याशी संपर्क आला होता.

Sameer Panditrao

मडगाव: विद्यार्थीदशेत असताना गोवा मुक्तिलढ्यात उडी घेऊन वयाच्या सतराव्या वर्षी सहकाऱ्यांसोबत म्हापसा येथील सत्याग्रहात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर (वय ८७ वर्षे) यांचे सकाळी (३० ऑक्टोबर) निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आजच मडगाव येथील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी सुमन, पुत्र अमित आणि नातवंडे असा परिवार आहे. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती खालावल्याने मडगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना सकाळी १०.४० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रभुगावकर आणि या सत्याग्रहात सामील झालेले त्यांचे इतर सहकारी काणकोण येथील होते. मात्र, शिक्षणानिमित्त ते कारवार येथे असताना रामदास फेणे या शिक्षकामुळे त्यांचा गोवा मुक्ती लढ्याशी संपर्क आला होता. त्यावेळी कारवार येथे होणाऱ्या मुक्ती लढ्याशी संबंधित सभा आणि मिरवणुकांत ते सामील व्हायचे. त्याच ऊर्मीतून अवघ्या १७ ते १८ वर्षांच्या या युवकांनी म्हापसा येथे सत्याग्रह करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. गोवा मुक्तीनंतर राज्य सरकारच्या सेवेत काम करून निवृत्त झालेले प्रभुगावकर यांनी वयाची ८५ वर्षे गाठली, तरी ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशीप योजनेत उद्योगांनी सहभागी व्हावे! गोवा औद्योगिक विकास महामंडळाची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

SCROLL FOR NEXT