Pramod Sawant on Budget Dainik Gomantak
Video

Pramod Sawant on Budget: सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा - मुख्यमंत्री

Pramod Sawant: आमच्‍या सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा आहे. माटोळीतील फळांप्रमाणेच अर्थसंकल्‍पातून सर्वांना सर्वकाही देण्‍यात आले आहे.

Sameer Amunekar

आमच्‍या सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा आहे. माटोळीतील फळांप्रमाणेच अर्थसंकल्‍पातून सर्वांना सर्वकाही देण्‍यात आले आहे. आमदारांनी अर्थसंकल्‍पावर टीका करण्‍यापूर्वी आपल्‍या मतदारसंघाला काय मिळाले याचा विचार करावा, असे म्‍हणत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्ताधारी गोविंद गावडे यांच्‍यासह विरोधी आमदारांना टोला लगावला.

गेले तीन दिवस चाललेल्‍या अर्थसंकल्‍पावरील चर्चेला उत्तर देत असताना मुख्‍यमंत्री सावंत यांनी काही नव्‍या घोषणाही सभागृहात केल्‍या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यासह इतर विरोधी आमदारांनी अर्थसंकल्‍पातील आर्थिक तरतुदींवर टीका केली. भाजप सरकार दरवर्षी केंद्र सरकार आणि खुल्‍या बाजारातून कर्ज काढून राज्‍य चालवत आहे. त्‍यामुळे राज्‍यावरील कर्जाचा बोजा वाढत असल्‍याचा आरोप त्यांनी केला.

त्‍यावर बोलताना, राज्‍य सरकारने गेल्‍या काही वर्षांत मर्यादेपेक्षा खूप कमी कर्ज केंद्र सरकारकडून घेतलेले आहे. केंद्राकडून राज्‍याला जे कर्ज मिळते ते बिनव्‍याजी आणि ५० वर्षांसाठी असते. पुढील ५० वर्षांनंतरही केंद्रात आणि राज्‍यात भाजपचेच सरकार असेल, त्‍यामुळे ते माफही होईल, असे म्‍हणत मुख्‍यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्‍युत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT