Dainik Gomantak
Video

Goa Beach Touting : समुद्रकिनारी कचरा फेकणे, दारू पिणे पडणार महागात; 'दलाली खपवून घेणार नाही'! पोलिसांचा थेट इशारा

Beach littering Fine Goa: रोजच्या रोज होणाऱ्या या दलाली करणाऱ्यांवर पर्यटक पोलिसांसह उत्तर जिल्हा पोलिस कारवाई करत आहेत आणि ही कारवाई अशीच सुरु राहील

Akshata Chhatre

पणजी: राज्यात यानंतर कोणतीही दलाली पोलीस खपवून घेणार नाहीत असा थेट इशारा उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलाय. शनिवार (दि.१९) रोजी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. रोजच्या रोज होणाऱ्या या दलाली करणाऱ्यांवर पर्यटक पोलिसांसह उत्तर जिल्हा पोलिस कारवाई करत आहेत आणि ही कारवाई अशीच सुरु राहील असं अक्षत कौशल म्हणाले आहेत.

कळंगुट,हणजूण, मांद्रे यांसारख्या भागांमध्ये सध्या पर्यटक पोलीस कार्यरत आहेत. गुन्ह्यांच्या आधारे आरोपींवर दंडात्मक किंवा अटकेची कारवाई केली जाते. आतापर्यंत गोवा पोलिसांकडून केलेल्या कारवाईत उत्तर आणि दक्षिण गोव्यामधून १००० संशयित व्यक्ती आढळून आले असून यांपैकी १९३ जणांवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शिवाय ५२५ प्रकरणे कचरा फेकल्याबद्दल आणि १४ प्रकरणे समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोवा पोलिसांनी शॅक व्यवसायिकांसोबत बैठक घेतली असल्याची माहिती एसपी अक्षत कौशल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT