Mopa racing fire incident Dainik Gomantak
Video

Mopa: इकडे रेस सुरु झाली, तिकडे आग आणि धुराचे लोट! मोपात नेमके काय झाले? Watch Video

Mopa racing fire incident: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘इंडिया कार रेस’ सुरू आहे. त्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या ट्रॅकच्‍या मधोमध वाढलेल्‍या गवताला अचानक आग आगली

Sameer Panditrao

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘इंडिया कार रेस’ सुरू आहे. त्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या ट्रॅकच्‍या मधोमध वाढलेल्‍या गवताला अचानक आग आगली व परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे कार रेस काही तास बंद ठेवण्यात आली. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

पेडणे अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुके कुरण असल्यामुळे आग सर्वत्र पसरत होती. इतर साहित्य-सामानाचे काही नुकसान झाले नाही. परंतु ज्या परिसरात कार रेस सुरू आहेत, त्‍या भागात सर्वत्र धूर झाला. नाइलाजाने रेस थांबवण्‍यात आली. सकाळपासून रेस पाहण्‍यासाठी लोक दाखल झालेत. गोवेकरांसाठी हा नवीन इव्‍हेन्‍ट असल्‍याने स्‍थानिकांनीही तेथे जाणे पसंत केले. दरम्‍यान, अचानक आग व धूर पसरल्‍याने काही स्‍पर्धकांनी नाराजी व्‍यक्‍त केली, अशीही माहिती काही प्रत्‍यक्षदर्शींनी दिली. आग शमवण्यासाठी अग्निशमनचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनात सुनील देसाई, ज्ञानेश्वर सावंत, फटू नाईक, विठ्ठल परब सह म्हापसा व पीर्णमधील जवानांनी शर्थीचे प्रयत्‍न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT