Goa FDA Raid Dainik Gomantak
Video

Porvorim FDA Raid: पर्वरीत ‘एफडीए’ची धडक कारवाई! 9 आस्थापनांची तपासणी; 3 रेस्टॉरंट्सना ठोकले टाळे

Goa FDA Raid: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शनिवारी पर्वरी परिसरातील रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.

Sameer Panditrao

पणजी: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शनिवारी पर्वरी परिसरातील रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत एकूण ९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामधून तीन आस्थापनांना अत्यंत अस्वच्छ स्वयंपाकघर आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ही सर्व रेस्टॉरंट्स पर्वरी येथील डेल्फिनो मागे कार्यरत होती. या आस्थापनांना त्यांच्या परिसराचे नूतनीकरण करून पुन्हा स्वच्छतेच्या निकषांचे पालन करीत असल्याची खात्री एफडीए कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती एफडीए संचालक श्वेता देसाई यांनी दिली.

ही मोहीम एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा (प्रभारी अधिकारी), अमित मांद्रेकर आणि लेनिन दे सा (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी राबवली.

सहा आस्थापनांना नोटिसा

इतर सहा आस्थापनांना एफएसएसएआय अंतर्गत सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात या विशेष मोहीम सुरूच राहणार असून सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे आणि एफडीए अधिकाऱ्यांच्या कारवाईची वाट पाहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa ZP Election Result 2025 Live Update: लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Bardez: बार्देशात नेत्यांसमोर वर्चस्वाचे आव्हान, सस्पेन्स वाढला; ‘सायलंट’ मतदानामुळे अंदाज बांधणे कठीण

SCROLL FOR NEXT