ED Raid Goa Dainik Gomantak
Video

ED Raid: गोव्यात ईडीकडून 2.29 कोटींची मालमत्ता जप्त

ED Raid Goa: गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला होता.

Sameer Panditrao

पणजी: ‘जिवा मान्स अँड मिनरल्स लिमिटेड’ आणि इतरांविरुद्ध पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद असून याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमएलए, २००२ अंतर्गत २.२९ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये दोन जमिनी आणि एका फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला होता. आरोपींविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याबाबत आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. तपासादरम्यान गुन्ह्यातील पैशांतून खरेदी करण्यात आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गालेल गावातील जमिनीचे दोन भूखंड आणि अंधेरी (पश्चिम) येथील एक निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT