Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
Video

Tawadkar on Birsa Munda: भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गौरव यात्रेचे आयोजन

Ramesh Tawadkar: झारखंडमधील थोर स्वातंत्र्यसेनानी व आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कल्याण खात्यातर्फे १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान पेडणे ते काणकोणपर्यंत सांस्कृतिक गौरव यात्रा आयोजित करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ramesh Tawadkar on Birsa Munda

पणजी: झारखंडमधील थोर स्वातंत्र्यसेनानी व आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कल्याण खात्यातर्फे १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान पेडणे ते काणकोणपर्यंत सांस्कृतिक गौरव यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान मुंडा यांनी दिलेले योगदान व त्यांनी केलेल्या कामगिरीची जनजागृती व प्रेरणा जनतेपर्यंत पोहचवण्याचा यामागील उद्देश आहे. पेडणे येथून ही यात्रा सुरू होईल व त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल तर समारोप काणकोण येथे केंद्रीय राज्यमंत्री दुर्गा दास के. व्ही. यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

पत्रादेवी - पेडणे येथे हुतात्मा स्मारक येथे १५ नोव्हेंबर सकाळी ९.३० वा. भगवान बिरसा मुंडा यांच्या तसबिरीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुष्पहार घालतील. यावेळी सभापती रमेश तवडकर यांच्यासह आमदार प्रवीण आर्लेकर व जीत आरोलकर हे उपस्थित असतील. त्यानंतर या गौरव यात्रेला मुख्यमंत्री सुरुवात करतील. पत्रादेवी येथून दुचाकी रॅली करासवाडामार्गे डिचोली व साखळी येथे जाईल. साखळी येथे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होईल. १६ रोजी साखळी येथून ही गौरव यात्रा आमोणा व फोंडा येथे जाईल.

मंत्री दुर्गादास व्ही.के. यांची उपस्थिती

२० रोजी समारोप कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी गौरव यात्रेला माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर हे बावटा दाखवतील. सुमारे १२०० हून अधिक लोक यामध्ये सामील होतील. काणकोण येथील रवींद्र भवनमध्ये समारोप होणार असून त्या ठिकाणी सभापती रमेश तवडकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री दुर्गा दास व्ही. के. हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदिवासी नेते भगवा बिरसा मुंडा यांच्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT