CM Pramod Sawant Goa Government Jobs Dainik Gomantak
Video

Goa Government Jobs: सरकारी खात्यातील सर्व रिक्त पदे लवकरच भरणार, CM सावंत

CM Pramod Sawant: सरकारी खात्‍यांतील सर्वच रिक्त पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्‍याची प्रक्रिया सरकारने गतिमान केलेली आहे. सर्व रिक्त पदे लवकरच आयोगामार्फत भरण्‍यात येतील, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: सरकारी नोकरभरती पारदर्शकपणे व्‍हावी, याच हेतूने राज्‍य सरकारने कर्मचारी भरती आयोगाची स्‍थापना केली. आयोगाकडून घेण्‍यात येणाऱ्या परीक्षांमध्‍ये पारदर्शकता असल्‍याने आणि उमेदवारांना पेपर संपताच गुण समजत असल्‍याने त्‍यांच्‍यात या परीक्षांबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत आयोगाने सरकारी नोकरीच्‍या ‘क’ वर्गातील ७५२ पदांसाठी जाहिरात दिलेली असून, त्‍यात निवड झालेले ५० जण सरकारी नोकरीत रुजूही झाले आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

कर्मचारी भरती आयोगाच्‍या पाटो-पणजी येथील नव्‍या कार्यालयाच्‍या उद्‍घाटन समारंभप्रसंगी मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयोगाचे सदस्य नारायण सावंत, शशांक ठाकूर उपस्थित होते.

सरकारी खात्‍यांतील सर्वच रिक्त पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्‍याची प्रक्रिया सरकारने गतिमान केलेली आहे. सरकारी खात्‍यांतील सर्व रिक्त पदे लवकरच आयोगामार्फत भरण्‍यात येतील, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT