Chodan Gram Sabha Protest Dainik Gomantak
Video

Chodan-Madel Gramsabha: पर्यावरणाचा नाश करणाऱ्या विकास प्रकल्पांना चोडण आणि दिवारमधून विरोध!!

Divar Island Eco-Tourism Project: या मेगा प्रकल्पांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल तसेच विद्यमान संसाधनांवरील ताण येईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे

Akshata Chhatre

चोडण: गोव्यातील प्रसिद्ध दिवार बेटाला पर्यटन गाव म्हणून घोषित करण्याला आणि इथे इको-टुरिझम प्रकल्प राबविण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला गोव्यातील चोडण-माडेल ग्रामसभेने तीव्र विरोध केला आहे.ग्रामपंचायतीने यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांवर लक्ष केंद्रित केले. बेटावरचे वातावरण आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामसभेत स्थानिकांकडून अनियमित पाणी आणि वीजपुरवठा, अरुंद रस्ते आणि फेरी सेवा या प्रमुख समस्यांचा उल्लेख करण्यात आला.

स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व मान्य करतानाच ग्रामसभेने शाश्वत विकासाच्या गरजेवर भर दिला.आलेल्या पर्यटकांच्या गरजा पुरवण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं ग्रामस्थ म्हणाले आहेत आणि सोबतच त्यांनी अशा कोणत्याही विकासासाठी स्थानिक समुदायाच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे असेही नमूद केले आहे. ग्रामसभेने या बेटावर होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचा एकमताने विरोध केला. या मेगा प्रकल्पांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल तसेच विद्यमान संसाधनांवरील ताण येईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT