Chodan Bridge: चोडण पूल भूसंपादन, पहिला धनादेश सुपूर्द

डिचोली व बार्देश तालुक्याला जोडणारा साल्वादोर दी मुंद चोडण पुलाच्या भू-संपादन प्रक्रियेचा पहिला धनादेश मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते चाको वर्गीस यांना शुक्रवारी, सुपूर्द करण्यात आला.
 de Mund Chodan Bridge
de Mund Chodan BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Chodan Bridge: डिचोली व बार्देश तालुक्याला जोडणारा साल्वादोर दी मुंद चोडण पुलाच्या भू-संपादन प्रक्रियेचा पहिला धनादेश मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते चाको वर्गीस यांना शुक्रवारी, सुपूर्द करण्यात आला.

 de Mund Chodan Bridge
Goa Startup Yatra: ‘गोवा स्टार्टअप यात्रा’ला सोमवारपासून सुरवात

म्हापसा येथील बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी., उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई व प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते. अंदाजित ८७ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

या पुलाच्या उभारणीसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पात केली आहे. सुमारे २०० मीटर लांबीच्या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात या वर्षाच्या शेवटी सुरवात होण्याची शक्यता वर्तवली जाते.

आमदार प्रेमेंद शेट यांनी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली सेल डीड पूर्ण करण्यात आल्याने संबंधित मालकाला हा धनादेश देण्यात आल्याचे सांगितले. या प्रक्रियेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित मालकांचे सरकारी अधिकाऱ्याचे आभार मानले.

पुलाच्या उभारणीसाठी सुरु असलेली भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर इतरांनाही धनादेश दिले जाणार आहेत. तसेच तेथील शेतकऱ्यांना १३ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळात जमा करण्यात आले आहे. चोडण फेरीसेवेमुळे लोकांना त्रास सहन करावे लागत होते. या पुलामुळे लोकांना बराच लाभ होणार आहे.

 de Mund Chodan Bridge
Gastroenterology In GMC : गोमेकॉत आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग

तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सुमारे २०१२ साली पुलाच्या उभारण्याचे काम हाती घेतले होते. भूसंपादनाची एकूण प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून समितीची स्थापन करण्यात आलेली.

प्रक्रिया अंतिम टप्प्यात : म्हांबरे

साल्वादोर दी मुंद बाजूने अंदाजित १८ हजार चौरस मिटर जागा तर चोडणच्या बाजूने ९ हजार मीटर जागा पुलासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रेमानंद म्हांबरे यांनी दिली. बऱ्याच जमीन मालकांनी जमीन देण्यासाठी तयारी दर्शवली असून ती पूर्ण झाल्यानंतर पुलासाठी लागणारे दाखले घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला आरंभ होणार असल्याचे म्हांबरे म्हणाले. या प्रक्रियेचे पूर्ण श्रेय आमदार प्रेमेंद्र शेट यांना जात असल्याचेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com