Canacona Politics Dainik Gomantak
Video

Canacona Politics: काणकोणात गोमंतक क्षत्रीय मराठा समाजाचे भाजपला थेट आव्हान

काणकोण मतदारसंघातून २०२७ च्या निवडणुकीत भाजपने गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अन्यथा वेगळा विचार करण्यात येईल, असा इशारा गावडोंगरीचे सरपंच धिल्लन ऊर्फ यशवंत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Manish Jadhav

काणकोण मतदारसंघातून २०२७ च्या निवडणुकीत भाजपने गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अन्यथा वेगळा विचार करण्यात येईल, असा इशारा गावडोंगरीचे सरपंच धिल्लन ऊर्फ यशवंत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. काणकोण मतदारसंघात गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाची पाच ते साडेपाच हजार मते आहेत. मात्र, प्रत्येक निवडणुकीत आपल्या फायद्यासाठी राजकारण्यांनी समाजामध्ये फूट पाडून आपले झेंडे नाचविले. याची जाणीव समाज बांधवांना झाली आहे. त्यासाठी गुप्त बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार करण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकीत सत्तर ते ऐंशी टक्के समाजाच्या मतदारांना एकत्र आणण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे. काही राजकारणी ‘पैसा फेको तमाशा देखो’ ही भाषा करीत आहेत. मात्र, समाजाचे मतदार पैशापुढे झुकणार नाहीत. ‌समाजाचे बहुतांश नेते भाजपबरोबर आहेत. भाजपमधील नगराध्यक्ष सारा नाईक देसाई, शांभा नाईक देसाई, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक धिरज नाईक गावकर हे होतकरू उमेदवार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT