Michael Lobo statement Dainik Gomantak
Video

Cabinet Reshuffle: "काही मंत्री जनतेसाठी कामच करत नाहीत" लोबो यांचा धक्कादायक आरोप; मंत्रिमंडळत फेरबदलाची मागणी

Michael Lobo on Reshuffle: मुख्यमंत्री कठोर परिश्रम करत आहेत, काही मंत्री देखील सक्रियपणे आपापल्या विभागांचा आढावा घेत आहेत, पण बाकीच्यांचं काय?

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या राजकीय वर्तुळात सध्या काहीसं अस्वस्थ वातावरण पाहायला मिळतंय. काही मंत्री जनतेची कामं करत नसल्याने नाराजी व्यक्त करत मायकल लोबो यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

"आम्ही कोणत्याही अटी किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तो निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा होता. ज्यांना पदं मिळायची होती, त्यांना मिळाली. पण आता त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा मात्र पूर्ण होत नाहीत. काही मंत्री चांगलं काम करत आहेत, पण काहीजण जनतेसाठी मुळीच काम करत नाहीत," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

मंत्रिमंडळात फेरबदल झाला नाही, तर किमान खात्यांची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. "जेव्हा खातेवाटप होईल, तेव्हा मी विशिष्ट खात्यांवर भाष्य करेन असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री कठोर परिश्रम करत आहेत, काही मंत्री देखील सक्रियपणे आपापल्या विभागांचा आढावा घेत आहेत, पण बाकीच्यांचं काय? ते काम करत आहेत की नाही, हे माध्यमांना चांगलंच माहीत आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.

विरोधी पक्षाच्या भूमिकेवरही लोबो यांनी नाराजी व्यक्त केली. "अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, आम्ही ते उपस्थित करतो, पण त्यावर ठोस तोडगा निघत नाही. विरोधी पक्षाचा आवाज खूप क्षीण झाला आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना अधिक मुद्दे उचलले असते, पण आता आम्ही तिथे नाही, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही," असं लोबो यांनी नमूद केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT