narve wall collapse Dainik Gomantak
Video

नार्वे येथे संरक्षक भिंत कोसळली, गणेश चतुर्थीच्या रात्री पाऊस ठरला कारणीभूत; सुदैवाने जीवितहानी नाही

Narve Bicholim Accident: रात्रीच्या वेळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका घराची संरक्षक भिंत कोसळून मोठी हानी झाली

Akshata Chhatre

डिचोली: एकीकडे संपूर्ण गोवा गणेश चतुर्थीच्या उत्साहात दंग असताना, नार्वे, डिचोली येथील एका कुटुंबासाठी ही रात्र दुर्दैवी ठरली. चतुर्थीच्या दिवशीच, म्हणजेच बुधवारी (दि. २७), रात्रीच्या वेळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका घराची संरक्षक भिंत कोसळून मोठी हानी झाली मात्र सुदैवाने यात कुणाच्याही जीवाला इजा पोहोचलेली नाही.

रात्री उशिरा गणेश चतुर्थीचा सण साजरा करून नार्वे येथील जानकी पाडोळकर त्यांच्या घरात शांतपणे झोपल्या असताना अचानक मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या घराची संरक्षक भिंत पूर्णपणे कोसळली होती.

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कुटुंबाला धीर दिला. पावसाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः चतुर्थीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या वेळी अशी घटना घडल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT