Fire near ancient banyan tree in Bicholim Dainik Gomantak
Video

Bicholim Tree Fire: 200हून अधिक वर्षांचा इतिहास, गावचे वैभव गेले जळून; डिचोली धुमाशेतील दुर्घटना, पहा Video

Dhumase Sateri Temple Tree Fire: अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास दोन तासाहून अधिक वेळ प्रयत्न करुन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील धुमाशे गावातील श्री सातेरी मंदिराजवळील पुरातन वटवृक्षाला आग लागण्याची घटना घडली. आग वेळीच नियंत्रणात आल्याने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नसला, तरी दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आणि गावचे वैभव असलेल्या या वटवृक्षाचा अधिकाधिक भाग जळून गेला आहे.

शनिवारी पहाटे वटवृक्षाला आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास येताच, डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास दोन तासाहून अधिक वेळ प्रयत्न करुन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.

याकामी स्थानिकांनीही मदतकार्य केले. सकाळची वेळ असल्यामुळे आगीचा भडाका उडाला नाही. ही आग नेमकी कशी लागली ते कळू शकली नाही. मात्र काल मध्यरात्री ही आग लागल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT