Ganesh Visarjan Goa Dainik Gomantak
Video

Adpoi Ganesh Visarjan: ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल'! आडपई गावची आगळीवेगळी गणपती विसर्जन परंपरा; Watch Video

Ganesh Visarjan Goa: आडपई गावातील विविध कुटुंबांचा दरवर्षी पाच दिवसांचा गणेशोत्सव असतो. राज्यात विविध भागात विखुरलेली आडपईतील कुटुंबे गणेशोत्सव काळात एकत्रित येतात.

Sameer Panditrao

फोंडा: ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ गजरात आडपईतील पाच दिवसांच्या विविध कुटुंबांच्या एकत्रित गणपतीचे आज रविवारी थाटात विसर्जन करण्यात आले. आकर्षक चित्ररथ मिरवणुकीसह गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली त्यात लहानथोरांचा मोठा सहभाग होता.

आडपई गावातील विविध कुटुंबांचा दरवर्षी पाच दिवसांचा गणेशोत्सव असतो. राज्यात विविध भागात विखुरलेली आडपईतील कुटुंबे गणेशोत्सव काळात एकत्रित येतात आणि उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतात. हा वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातील या कुटुंबांचे नातेवाईक, इष्ट तसेच अन्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. यंदा आध्यात्मिक आणि पौराणिक विषयांबरोबरच पेहलगाम येथील ऑपरेशन सिंदूरचा चित्ररथही साकारण्यात आला होता.

मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात गणपतींची विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. पूर्ण रस्त्यावर विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यानंतर दत्त मंडपात सर्व गणपती एकत्रित झाल्यानंतर विसर्जन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT