Partagali Jeevottam Math  Dainik Gomantak
Video

Partagali Jeevottam Math: पर्तगाळी श्री गोकर्ण जीवोत्तम मठाच्‍या वर्धापन दिसाची तयारी नेटान; Video

Partagali Math Ramayan Park: ५५० व्‍या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्‍या सार्थ पंचशताद्बी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने या मठ परिसराचा कायापालट करण्‍यास सुरुवात केली आहे.

Sameer Panditrao

पर्तगाळी येथील श्री गोकर्ण जीवोत्तम मठाच्‍या स्‍थापनेच्‍या ५५० व्‍या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्‍या सार्थ पंचशताद्बी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने या मठ परिसराचा कायापालट करण्‍यास सुरुवात केली आहे. या मठ संकुलाच्‍या प्राकारात उभे राहणारे ‘रामायण पार्क’ हा त्‍याचा केंद्रबिंदू ठरणार आहे. हा स्‍टेट ऑफ द आर्ट प्रकल्‍प भाविक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. भविष्‍यात ही मठवास्‍तू धार्मिक पर्यटनाचे गोव्‍यातील मुख्‍य केंद्र ठरण्‍याची शक्‍यता आहे.

सध्‍या या आगळ्‍यावेगळ्‍या पार्कचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्‍प पूर्णावस्‍थेत येणार आहे. या पार्कचा आकार धनुष्‍याकृती असून याच पार्कमध्‍ये ७७ फूट उंचीचा श्रीरामाचा पुतळा उभा राहणार आहे. २० नोव्‍हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे.

सध्‍या पर्तगाळी येथील मठ संकुलात हजारो कामगार हा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी दिवस रात्र झटत आहेत.या प्रकल्‍पाचे बांधकाम अभियंते अभय कुंकळयेकर यांच्‍या देखरेखीखाली चालू आहे. या प्रकल्‍पासंदर्भात माहिती देताना कुंकळयेकर म्‍हणाले, या संपूर्ण परिसरात हे पार्क अगदी आगळे वेगळे ठरणार असून या पार्कसाठी खास लँडस्‍केपींग केले जाणार आहे. याच पार्कमध्‍ये ७७ फूट उंच श्रीरामाचा ब्राँझचा पुतळा उभा केला जात असून दिल्‍लीतील प्रसिद्ध कारागीर पद्मश्री राम सुतार यांच्‍याकडून हा पुतळा तयार केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT