goa beach wedding shoot Dainik Gomantak
मनोरंजन

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

tejashree pradhan destination wedding: वीण दोघातली ही तुटेनाने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिले डेस्टिनेशन बीच वेडिंग आयोजित करून एक नवा 'माईलस्टोन' रचलाय

Akshata Chhatre

veen doghatli hi tutena: मोठ्या पडद्याला टक्कर देणारा सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या शर्यतीत झी मराठी नेहमीच आघाडीवर असते. याच परंपरेत, झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ ने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिले डेस्टिनेशन बीच वेडिंग आयोजित करून एक नवा 'माईलस्टोन' रचलाय. मालिकेतील दोन जोडप्यांचा हा 'महाविवाह सोहळा' गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आला असून, या अभूतपूर्व उपक्रमाने मालिकेच्या दर्जाला नवी उंची दिली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 'फिश फूड' आनंद

या मालिकेत 'स्वानंदी'ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधानने गोव्यातील शूटिंगचा अनुभव खासगीरित्या शेअर केला. "‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या महाविवाह सोहळ्याचे शूटिंग करताना मी सगळ्यात जास्त एन्जॉय केले ते म्हणजे तिथले चटकदार मासे खाऊन!" असे तिने म्हटलेय.

गोव्यात सध्या तापमान अधिक असल्याने प्रचंड उष्णता आणि वेडिंग लूक सांभाळणे हाच मोठा टास्क असल्याचं कलाकार म्हणाले आहेत. ४० ते ४४ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानात, समुद्रकिनाऱ्यावर भरगच्च कपडे, दागिने आणि मेकअप सांभाळून शूटिंग करणे हे कलाकारांसाठी मोठे आव्हान होते. उष्ण वातावरणातही भूमिकेतील भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि लूक खराब होऊ न देणे, यासाठी संपूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागली.

सूर्यास्ताचा क्षण: थकवा घालवणारी जादू

सूर्य मावळायला लागल्यावर वातावरण थंड आणि आल्हाददायक होते. यांनतर आकाशात दिसणारा सुंदर तांबडा रंग पाहताना सगळे कलाकार आणि क्रू मेंबर्स आपले काम थांबवून त्या मनमोहक सूर्यास्ताचा आनंद घेतला.

राजवाडे कुटुंब हे समाजात प्रतिष्ठित असल्याने, त्यांच्या 'स्टेटस'ला साजेसा वधू आणि वराचा लूक तयार करण्यावर निर्मात्यांनी विशेष लक्ष दिले. वधू-वराच्या हळदी आणि वेडिंग लूकसाठी खास ब्लाउज डिझाईन्स आणि सुंदर साड्या तयार करण्यात आल्या. वराचा लूकही तितकाच राजेशाही ठेवण्यात आला.

टीव्हीसाठी 'तडजोड' नाही

मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिला डेस्टिनेशन वेडिंग 'माईलस्टोन' म्हणावा लागेल. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेचा हा महाविवाह सोहळा मराठी टेलिव्हिजनवरील एक सुवर्णक्षण ठरला असून, असे भव्य उपक्रम वारंवार यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT