Sonakshi Sinha And Zaheer Iqbal  Dainik Gomantak
मनोरंजन

Sonakshi Sinha: जहीर इक्बालनं दिली सोनाक्षीसोबतच्या नात्याची कबुली

जहीरच्या सोशल मीडिया पोस्टमधून सोनाक्षी आणि त्याच्या नात्याचा खुलासा

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहेत. दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून चालू होत्या. मात्र दोघांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. अखेर सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या रिलेशनशिपचा खुलासा झाला आहे. इक्बालनं इंस्टाग्रामवर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

जहीर इक्बालने केलेल्या या पोस्टवर सोनाक्षीनेही एक प्रकारे प्रेमाला उत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. जहीरच्या या पोस्टवर सोनाक्षी लिहते, “धन्यवाद… खूप प्रेम आणि आता मी तुला मारायला येत आहे.” जहीरच्या या इंस्टाग्राम पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरैशी यांनी कमेंट करून दोघांसाठी प्रेम आणि आनंद व्यक्त केला आहे.

जहीर इक्बालनं स्वतःच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये जहीरन सोनाक्षीवर प्रेम करत असल्याचं मान्य केल आहे. एवढंच नाही तर याच पोस्टवर सोनाक्षीनं केलेली कमेंट देखील तेवढीच चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांसह बरेच बॉलिवूड सेलिब्रेटी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. इक्बालनं सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाक्षी… आय लव्ह यू… मला न मारल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात आपण असंच खूप खात राहू आणि खूप प्रेम असही त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.

जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जहीर इक्बालनं सलमान खान निर्मित ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होत. दरम्यान सोनाक्षीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की बॉलिवूड पदार्पण केलं त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचं हे नातं ५ वर्ष टिकलं अशी ती बोलली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT