संजय लीला भन्साळीच्या नवीन चित्रपटात दिसणार सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर (Salman Khan) केली होती.
Actress Sonakshi Sinha and Director Sanjay Leela Bhansali
Actress Sonakshi Sinha and Director Sanjay Leela Bhansali Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर (Salman Khan) केली होती. या चित्रपटापासून सोनाक्षीने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांत काम केले आहे. आता अलीकडेच सोनाक्षी सिन्हाच्या हातात एक मोठा प्रकल्प आला आहे. सोनाक्षी आता संजय लीला भन्साळीसोबत काम करणार आहे.(Sonakshi Sinha will play a different character in Sanjay Leela Bhansali film Heera Mandi)

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी सोनाक्षी सिन्हाला त्याच्या नव्या चित्रपटासाठी साइन केले आहे. हा सोनाक्षीच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट असल्याचे सिद्ध होईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Actress Sonakshi Sinha and Director Sanjay Leela Bhansali
Bhoot Police First Look: अर्जुन कपूरचा खतरनाक लूक होतोय व्हायरल !

सोनाक्षी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘हीरा मंडी’ (Heera Mandi) चित्रपटात दिसणार आहे.बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार संजयने आपल्या चित्रपटासाठी दोन बॉलिवूड अभिनेत्रींची निवड केली आहे. सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha New film) अगोदर निर्मात्यांनी हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांनाही या चित्रपटासाठी साइन केले आहे.

यापूर्वी ‘राउडी राठोड’ चित्रपटात संजय लीला भन्साळीच्या निर्मितीमध्ये सोनाक्षी सिन्हाने काम केले होते. पण आता ती संजय लीला भन्साळीसोबत पहिल्यांदा 'हीरा मंडी' मध्ये काम करणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे सोनाक्षीच्या कास्टिंगची घोषणा केलेली नाही.

Actress Sonakshi Sinha and Director Sanjay Leela Bhansali
राजपाल यादवनं केला नावात बदल; जाणून घ्या

कशी असेल सोनाक्षीची भूमिका ?

बातमीनुसार, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या वृत्तानुसार सोनाक्षीने या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी तयारी देखील सुरू केली आहे. या भूमिकेत येण्यासाठी अभिनेत्री स्वत: वर काम करत आहे. इतकेच नव्हे तर अभिनेत्री अगदी कथक शिकते असेही म्हटले जात आहे. संजय लीला भन्साळीची 'हिरा मंडी' एक मेगा बजेट वेब सीरिज असेल.

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. या चित्रपटात अजय देवगन आणि संजय दत्तसारखे अनेक कलाकार सोनाक्षीसमवेत दिसणार आहेत. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनाक्षीने आतापर्यंत लुटेरा, दबंग, आर राजकुमार, अकिरा, कलंक, मिशन मंगल, सोन ऑफ सरदार अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून निर्बाध अभिनय सादर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com