Why Dharmendra apologized to fans

 

dainik Gomantak

मनोरंजन

मी तुम्हाला बोर केल... म्हणत धर्मेंद्र ने मागितली फॅन्सची माफी

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला, आणि या फोटोला कॅप्शन दिले, "तो स्वतःची चांगली काळजी घेत नाही"

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) यांची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अभिनेते अनेकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अभिनेत्याने नुकताच बॉबीचा (Boby deol) एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. आणि या फोटोला शेअर करत कॅप्शन लिहिले, "तो स्वतःची चांगली काळजी घेत नाही." आता या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी धर्मेंद्रने बॉबीचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो हसताना दिसत आहे. त्याच्या एका चाहत्याला उत्तर देताना धर्मेंद्र म्हणाले की, कधी कधी माझ्या सुंदर बॉबीला समजून घेण्यासाठी मी अशी छायाचित्रे शेअर करतो जेणेकरून तो स्वतःची काळजी घेईल. त्यांनी पुढे लिहिले की, "मित्रांनो, अशी मुले मिळल्यान मी खूप भाग्यवान आहे."

मंगळवारी धर्मेंद्र यांनी त्यांच्या अनेक चाहत्यांचे आभार मानले ज्यांनी त्यांच्या चित्रपटांची जुनी गाणी, व्हिडिओ क्लिप शेअर केल्या. काही लोकांनी त्यांना सनीसोबतच्या काही फोटोंमध्ये टॅगही केले. दरम्यान, घमेंद्र यांनी चाहत्यांची माफी मागितली, त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, “आज कळले एकाट वेळी इतके ट्विट का केले, तुम्हाला बोर कल्याबद्दल मला माफ करा.

'रॉकी और रानी'मध्ये दिसणार आहे.

धर्मेंद्र करण जोहरच्या रॉकी आणि रॉनीची प्रेमकथा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. नुकतेच क्रूने दिल्लीचे शूट पूर्ण केले. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

सनी देओल 'गदर 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त

धर्मेंद्रप्रमाणेच सनी आणि बॉबीही वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या तिघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही. बॉबी देओल बराच काळ चित्रपट जगतापासून दूर होता. सलमान खानने रेस 3 मध्ये त्याच्या करिअरला संधी दिली. सध्या त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. सध्या सनी देओल त्याचा आगामी चित्रपट 'गदर 2' चे शूटिंग करत आहे. त्यामुळे पिता-पुत्राची जोडी एकत्र येण्याची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT