Muqaddar Ka Sikandar

Muqaddar Ka Sikandar

Dainik Gomantak

रेखा आणि अमिताभयांच्या 'या' सिनमुळे जया बच्चन यांच्या डोळ्यात आले होते पाणी

रेखा: द अनटोल्ड स्टोरी या त्यांच्या चरित्र पुस्तकातही ही गोष्ट लिहिली आहे. हे पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहिले आहे. रेखा यांच्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या कथा या पुस्तकात नोंदवल्या आहेत.
Published on

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी त्यांच्या काळातील सुपरहिट जोडी मानली जाते. हा तो काळ होता जेव्हा रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चाही सर्रास होत होत्या. जया बच्चन यांच्या विरोधानंतर दोघे वेगळे झाले. अमिताभ आणि रेखा यांची जोडी मोठ्या पडद्यावर थिरकायची, त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. मात्र जया बच्चन यांना याचे फार वाईट वाटले. एकदा मोठ्या पडद्यावर अमिताभ आणि रेखाचा लव्ह सीन पाहून जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणी आले.

<div class="paragraphs"><p>Muqaddar Ka Sikandar</p></div>
हरनाज संधूला 'या' अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये करायचंय पदार्पण

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांचा मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट आला तेव्हाची ही गोष्ट आहे. खुद्द रेखा यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एवढेच नाही तर रेखा: द अनटोल्ड स्टोरी या त्यांच्या चरित्र पुस्तकातही ही गोष्ट लिहिली आहे. हे पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहिले आहे. रेखा यांच्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या कथा या पुस्तकात नोंदवल्या आहेत.

रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एकदा मुकद्दर का सिकंदर (Muqaddar Ka Sikandar) चित्रपटाच्या ट्रायल शोमध्ये अभिनेता आपल्या संपूर्ण कुटुंबासह तेथे पोहोचला होता. रेखा प्रोजेक्शन रूममधून हा चित्रपट पाहत होती. जया बच्चन (Jaya Bachchan) पुढच्या रांगेत तर अमिताभ आपल्या आई-वडिलांसोबत मागच्या रांगेत बसले होते. तो जया बच्चनला स्पष्टपणे पाहू शकत नव्हता, पण रेखा मात्र तिला पाहू शकत होती. रेखा म्हणाली की, जेव्हा आमचा लव्ह सीन पडद्यावर आला तेव्हा मला तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू दिसत होते.

<div class="paragraphs"><p>Muqaddar Ka Sikandar</p></div>
प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरुन 'जोनास' नाव काढण्याचे सांगितले कारण!

याच्या एका आठवड्यानंतर इंडस्ट्रीतील प्रत्येकजण मला सांगत होते की अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निर्मात्यांना स्पष्ट पणे सांगितले आहे की ते माझ्यासोबत काम करणार नाहीत, परंतु जेव्हा मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मला याबद्दल काहीही विचारु नये, याविषयावरती माझ्याशी काहीही बोलू नका. मात्र, तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा या तिघांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसली. यश चोप्राच्या सिलसिला या चित्रपटात (Movie) अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा आणि जया या दोघीही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com