Actor Akshay Kumar and Actress Katrina Kaif Instagram/ Akshay and Katrina
मनोरंजन

चक्क! कतरिना अक्षय कुमारला राखी बांधणार होती...

अक्षय (Akshay Kumar) आणि कतरिनाला (Katrina Kaif) पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना आवडते. हेच कारण आहे की चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) शाहिद कपूरपासून (Shahid Kapoor) कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अक्षय कुमारपर्यंत (Akshay Kumar) या यादीत समावेश आहे. अक्षय आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना आवडते. हेच कारण आहे की चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती.अक्षय आणि कतरिनाने स्क्रीनवर आपल्या रोमॅन्सने सगळ्यांची मन जिंकली आहेत .पण पडद्यामागे दोघांनेही एकमेकांचे पाय खेचले आहेत. अशा परिस्थितीत अलीकडे एक किस्सा समोर आला आहे की कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती.(When Katrina Kaif wanted to tie Akshay Kumar to Rakhi)

2016 मध्ये कतरिना कैफ करण जोहरचा शो कॉफी विथ करणमध्ये (Koffee With Karan) पोहोचली. येथे बोलतांना कतरिनाने चाहत्यांना एक धक्कादायक गोष्ट सांगितली. तीस मार खान या चित्रपटाच्या शीला की जवानी या प्रसिद्ध गाण्याचे शूटिंग करत असताना खिलाडी कुमारला राखी बांधायची आहे, असे कतरिनाने सांगितले होते. पण कलाकार यासाठी तयार नव्हते.कतरिना कैफने सांगितले होते की त्यावेळी मी अशा व्यक्तीला शोधत होते ज्या व्यक्तीचा मी आदर करते आणि एक चांगला मित्र मानते, मग मी अक्षयला सांगितले की मी तुला राखी बांधू शकते का? हे ऐकल्यानंतर अक्षयने म्हटलं होतं की कतरिना तुला कानाखाली खायची आहे का ? अर्जुन कपूरलाही राखी बांधण्याची इच्छा असल्याचे अभिनेत्रीने त्यावेळी सांगितले होते, पण अर्जुननेही कतरिना कैफला नकार दिला.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी बर्‍याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन स्टार्सनी हमको दीवाना कर गाए, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, तीस मार खान, दे दना दन, वेलकम यासारखे अनेक चित्रपट केले आहेत. आता जवळपास 10 वर्षांनंतर अक्षय कतरिना पुन्हा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) चित्रपटात दिसणार आहे. कोरोनामुळे चित्रपटाचे प्रकाशन वर्षभरापासून लटकले आहे. हा चित्रपट आता 15 ऑगस्टच्या आसपास प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT