Vivek Agnihotri Dainik Gomantak
मनोरंजन

Vivek Agnihotri Apologized: दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींनी कोर्टात मागितली माफी...5 वर्षांपूर्वीचं ते प्रकरण नेमकं काय आहे?

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी 5 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणासाठी कोर्टात माफी मागितली आहे

Rahul sadolikar

बॉलिवूडसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी कोर्टात माफी मागितली आहे. 5 वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणासाठी ही माफी त्यांनी मागितली. विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहून माफी मागितली आहे. त्यांनी हे बिनशर्त केले आहे, त्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावरील अवमानाच्या कारवाईतून सुटका केली आहे.

 न्यायालयाने त्यांना ताकीद देऊन हे प्रकरण बंद केले आहे. त्याचं झालं असं की 2018 साली चित्रपट दिग्दर्शकाने ट्विटरवर एक पोस्ट केली होती आणि त्यात त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पक्षपाती म्हटलं होतं. त्यातच आता त्यांनी पाच वर्षांनंतर माफी मागितली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी 2018 साली न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या विरोधात ट्विट केले होते. या प्रकरणी न्यायालयाने स्वतः पुढे जाऊन चित्रपट निर्मात्यावर अवमानाचा खटला दाखल केला.

 यानंतर सोमवारी, 10 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना फटकारले आणि हजर राहण्याचे आदेश दिले, तेव्हा विवेकने पोहोचताच माफी मागितली. यावेळी न्यायालयाने विवेक अग्निहोत्रीच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. मात्र त्यांनी बिनशर्त माफी मागितली.

निर्णय देताना न्यायालयाने विवेक अग्निहोत्रीचा हेतू दुखावण्याचा नव्हता असे म्हटले आहे. या कारणास्तव त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय, जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे त्यावर न्यायालयाने असेही म्हटले आहे की, दिग्दर्शकाने हे जाणूनबुजून केले नाही.

 त्यामुळे कारणे दाखवा नोटीसही मागे घेतली आहे. मात्र, न्यायालयाने विवेक अग्निहोत्री यांना भविष्यात पुन्हा असे न करण्याचा सल्लाही दिला आहे.

विवेक अग्निहोत्रींनी २०१८ मध्ये ट्विट केले होते. त्यात त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या नजरकैदेच्या आदेशावर आपली प्रतिक्रिया दिली आणि न्यायमूर्ती एस मुरलीधर यांना पक्षपाती म्हटले. 

त्यावर कारवाई करत न्यायालयाने त्यांच्यावर अवमानाचा गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची स्वतंत्र सुनावणी २४ मे रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT