virat kohli fan story Dainik Gomantak
मनोरंजन

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

virat kohli viral fan story: आक्रमकतेच्या मागे तो चाहत्यांसाठी किती विनम्र आहे, याचा एक भावनिक अनुभव एका चाहत्याने कोरा या सोशल मीडियावर शेअर केलाय

Akshata Chhatre

Virat Kohli meeting experience: ५ नोव्हेंबर! भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' विराट कोहली याचा वाढदिवस. विराट कोहलीचे मैदानवरील आक्रमक ॲटिट्यूड आणि प्रतिस्पर्धकांना तोंड देण्याचा त्याचा स्वभाव जगप्रसिद्ध आहे. पण या आक्रमकतेच्या मागे तो चाहत्यांसाठी किती विनम्र आहे, याचा एक भावनिक अनुभव एका चाहत्याने कोरा या सोशल मीडियावर शेअर केलाय.

प्रेरणादायी 'ॲटिट्यूड'ने आयुष्य बदलले

हा चाहता २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून कोहलीचा कट्टर फॅन बनला. पण २०१७ मध्ये, 'कोहलीच्या ॲटिट्यूड'मधून त्याला जीवनात प्रेरणा मिळाली. "कोहलीच्या याच स्वभावामुळे मी जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना सामोरे जाण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन विकसित केला, ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले," असे या चाहत्याने सांगितले.

हा चाहता सांगतो की, २०१६ पासून अनेकवेळा विराटला भेटण्याचा प्रयत्न केला होता; कधी टीम हॉटेलमध्ये, तर कधी त्याच्या पश्चिम विहारमधील ॲकॅडमीत किंवा गुरुग्राम येथील घरी. पण प्रत्येक वेळी त्याला निराशाच मिळाली.

चार तास प्रतीक्षा आणि 'स्वप्न' साकारले

अखेरीस १५ मे २०१७ रोजी या चाहत्याचे स्वप्न पूर्ण झाले. तो थेट विराट कोहलीच्या घरी पोहोचला आणि त्याने सुरक्षा रक्षकांना भेटण्याची विनंती केली. सुरक्षा रक्षकांनी 'विराट व्यस्त आहे, भेटू शकणार नाही' असे सांगितल्यावरही, या चाहत्याने इतर काही शेजारच्या मुलांसोबत तब्बल चार तास घराबाहेर वाट पाहिली.

संध्याकाळी ७ वाजता विराटचा मोठा भाऊ विकास कोहली घरी आला. चाहत्याने आपले रेखाटलेले विराटचे सुंदर स्केच दाखवून भेटण्याची विनंती केली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत विकासने आत येऊन 'विराट जिममध्ये आहे, तो ३० मिनिटांत भेटायला येईल,' असे सांगितले.

मिठी आणि मार्करची धाव

ठरल्या वेळेनंतर गेट उघडले आणि हा चाहता आत जाणारा पहिला व्यक्ती होता. समोर पाहताच, टी-शर्ट आणि लोअरमध्ये आपला आयकॉनिक दाढी असलेला विराट कोहली त्याच्या रूममधून बाहेर येताना दिसला.

त्याला पाहताच उत्साहामुळे चाहत्याचे पाय थरथरू लागले आणि तो हसूही शकला नाही. चाहत्याने विराटसोबत शेक हॅन्ड केले, त्याला स्केच दाखवले आणि तो किती मोठा चाहता आहे हे सांगितले. विराट केवळ हसला! त्यानंतर 'मी तुम्हाला मिठी मारू शकतो का?' असे विचारल्यावर विराट 'हो' म्हणाला.

मिठी मारल्यानंतर त्याने २-३ सेल्फी घेतले आणि स्केचवर ऑटोग्राफ घेतला. एका लहान मुलाने बॅटवर सही मागितल्यावर, विराटने लगेच म्हटले, "रुको, मार्कर लेके आता हूँ" (थांबा, मार्कर घेऊन येतो). तो आत जाऊन स्वतः मार्कर घेऊन आला आणि सही केली. चाहत्यांच्या प्रती असलेली त्याची ही विनम्रता खरोखरच कौतुकास्पद असल्याचे या चाहत्याने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT