Virat Kohli: गोंयकारांना विराटचं सरप्राईझ!! समुद्रकिनारी 'One8 Commune'ची ग्रँड एन्ट्री, वाढदिवसाच्या दिवशी करणार शानदार उद्घाटन; Watch Video

Virat Kohli one8 Commune Goa : शिवोलीजवळील शापोरा नदीकिनारी वसलेले हे 'वन८ कम्यून'चे १६ वे आऊटलेट आणि गोव्यातील पहिलेच आहे
virat kohli new restaurant in goa
Virat Kohli New Restaurant in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

one8 commune new outlet in goa: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेला खेळाडू विराट कोहली याचा आज वाढदिवस. विराट कोहली आणि गोवा याचे तसे कनेक्शन खास, आणि यालाच आणिखीन जोड देत त्याच्या 'वन८ कम्यून' (One8 Commune) या फाईन-डाईनिंग रेस्टॉरंट साखळीने आता गोव्यात पदार्पण केलंय.

आजपासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून हे रेस्टॉरंट अधिकृतपणे खाद्यप्रेमींसाठी खुले झाले आहे. शिवोलीजवळील शापोरा नदीकिनारी वसलेले हे 'वन८ कम्यून'चे १६ वे आऊटलेट आणि गोव्यातील पहिलेच आहे.

आपण म्हणतो की, 'मनात जाण्याचा मार्ग पोटातून जातो' आणि विराटचे हे रेस्टोरंट या तत्त्वज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. तेथे येणाऱ्या पाहुण्यांना शांत वातावरण आणि उत्कृष्ट पदार्थांचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळेल.

डिझायनर आयुषी मलिक यांनी या रेस्टॉरंटच्या अंतर्गत सजावटीत गोव्याचा खास 'बोहो' लूक आणि भूमध्यसागरीय (Mediterranean) किनारपट्टीवरील सौंदर्य यांचा सुरेख संगम साधला आहे.

संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये सूर्यप्रकाशित पोत (Sun-washed textures), हलके वारे ये-जा करू शकतील असे कापडी कॅनोपी (Canopies) आणि लाकडी रस्ते पाहायला मिळतात. हा रस्ता थेट एका विहंगम बाह्य डेक (Outdoor Deck) पर्यंत जातो, जिथून शापोरा नदीचा नयनरम्य देखावा दिसतो.

सुमारे १८० पाहुण्यांची आसनक्षमता असलेले हे रेस्टॉरंट कुटुंबासोबत दुपारचे जेवण, रोमँटिक डेट नाईट किंवा शांत सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. हे ठिकाण एखाद्या जुन्या इटालियन घराची उबदारता दर्शवते. लाकडी बार काउंटर, काचेचे दरवाजे आणि नारळाची झाडे यामुळे गोव्याच्या आळशी आणि शांत वातावरणाशी ते पूर्णपणे जुळते.

virat kohli new restaurant in goa
Virat Kohli: क्रिकेटचा किंग! 'विराट कोहली 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे विधान व्हायरल Video

ग्लोबल मेन्यूमध्ये 'देसी टच': स्थानिक पदार्थांचीही चव

'वन८ कम्यून'चा मेन्यू 'ग्लोबल कम्फर्ट फूड' (Global Comfort Food) संकल्पनेवर आधारित आहे. त्यात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांची अनोखी जोड दिली आहे. येथे आलेल्या खवय्यांना मेझे प्लॅटर्स (Mezze Platters), कॅलेब्रीयन मिरचीसोबत बुर्टा (Burrata with Calabrian chilli), ट्रफल मशरूम फायलो (Truffle Mushroom Phyllo) आणि टुना-किमची बाऊल्स यांसारख्या ग्लोबल डिशेसची चव घेता येईल. मुख्य पदार्थांमध्ये पिझ्झा (Pizzas) आणि स्लायडर्सपासून ते पोटभरीचे राईस बाऊल्स आणि प्रसिद्ध 'खओ सुए' (Khao Suey) पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ज्यांना घरच्या जेवणाची आठवण येते, त्यांच्यासाठी भारतीय प्रेरित पदार्थांचा खास विभाग आहे. यामध्ये जुन्या कुटुंबातील क्लासिक पदार्थांना आधुनिक पद्धतीने सादर केले आहे. बादे, आसगाव येथे स्थित हे रेस्टॉरंट रोज दुपारी १२ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील. विराट कोहलीच्या ऑफ-फिल्ड स्टाईलचे उत्कृष्ट प्रतिबिंब 'वन८ कम्यून' गोव्यात पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com