गोवा फुटबॉलमध्ये 'ऑपरेशन क्लिनअप' जोमात! 14 खेळाडूंवर 288 पानांचं 'चार्जशीट' दाखल; मॅच फिक्सिंगप्रकरणी 10 दिवसांचा अल्टिमेटम

Goa Football Association Match Fixing: गोव्याच्या फुटबॉल क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 'गोवा फुटबॉल असोसिएशन'ने मोठी कारवाई केली आहे.
Goa Football Association Match Fixing
Goa Football Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या फुटबॉल क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 'गोवा फुटबॉल असोसिएशन'ने मोठी कारवाई केली आहे. 2025-26 च्या 'गोवा प्रोफेशनल लीग' हंगामात झालेल्या संशयास्पद सामन्यांच्या चौकशीनंतर जीएफएच्या समितीने तब्बल 14 खेळाडूंवर 288 पानांचे दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल केले. या खेळाडूंमध्ये प्रामुख्याने 'चापोरा युवक संघ' या क्लबच्या माजी सदस्यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना आपले स्पष्टीकरण देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास निवृत्त पोलीस उपअधीक्षक संदेश टी. चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने केला आहे. या प्रकरणाची सुरुवात चापोरा युवक संघाने केलेल्या तक्रारीवरुन झाली होती. क्लबने यापूर्वीच मॅच फिक्सिंगच्या संशयावरुन आपल्या 9 खेळाडूंना संघातून काढून टाकले होते. त्यानंतर जीएफएने गांभीर्याने दखल घेत तपासाची व्याप्ती वाढवली. फुटबॉलमधील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे गोव्याच्या फुटबॉलच्या (Football) प्रतिमेला राष्ट्रीय स्तरावर धक्का लागला होता.

Goa Football Association Match Fixing
Goa Football: गोवा भारतातील 'फुटबॉल'चं माहेरघर कसं बनलं? काय असेल कारण? वाचा...

जीएफएचे अध्यक्ष डॉ. कैतानो जोस फर्नांडिस यांनी या कारवाईबाबत ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, "2022 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून मी गोव्याच्या (Goa) फुटबॉलमधील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार साफ करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्या दिशेने योग्य पावले उचलत आहोत. खेळाच्या सचोटीशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जीएफए अत्यंत कठोर पावले उचलणार आहे." फुटबॉलमधील ही 'क्लीन-अप' मोहीम गोव्यातील युवा खेळाडूंसाठी आणि खेळाच्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे फुटबॉल वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून दोषारोपपत्र मिळालेल्या खेळाडूंच्या उत्तरानंतर आता काय कायदेशीर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com