Vijay Deverakonda Twitter/Vijay Deverakonda
मनोरंजन

विजय देवरकोंडाने केला शर्टलेस फोटोशूट, गुलाबाच्या फूलांनी झाकला...

'लिगर' चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

'लिगर' चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक समोर आला आहे. होय, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून त्याच्या पात्राची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकीकडे विजय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे अनन्या पांडेही 'लिगर'मधून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. (Shirtless photoshoot done by Vijay Deverakonda)

विजयने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये अभिनेता कपड्यांशिवाय पोज देताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत विजयने चित्रपटात काम करतानाचा अनुभव थोडक्यात शेअर केला. "एक चित्रपट ज्याने माझे सर्व काही घेतले. ही माझी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. त्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले आहे! लवकरच येत आहे." असे कॅप्शन विजयने आपल्या पोस्ट ला दिले आहे.

हा चित्रपट पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला आहे आणि धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत करण जोहर निर्मित आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. विजय आणि अनन्या व्यतिरिक्त या चित्रपटात रम्या कृष्णा, रोनित रॉय, अली, मकरंद देशपांडे आणि विष्णू रेड्डी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 25 ऑगस्ट 2022 रोजी लिगर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लिगारमध्ये विजय देवरकोंडा हा मार्शल आर्ट्स फायटरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दुसरीकडे बॉक्सर माईक टायसन हा चित्रपटात त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट खूप चर्चेत आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीतील अनन्या पांडे आणि माईक टायसन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

दरम्यान, साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर विजयचे चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. विजयचा हा फोटो एका वर्गाला खूप आवडला आहे, तर दुसरीकडे त्यावर जोरदार टीका होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विजय पूर्णपणे नग्न दिसत आहे. अभिनेत्याने त्याच्या प्रायव्हेट पार्ट गुलाबाचा पुष्पगुच्छामागे लपवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT