The Great Indian Family Trailer Relese Dainik Gomantak
मनोरंजन

एका निनावी पत्राने जेव्हा एका तरुणाचा धर्म कळतो... 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा हा ट्रेलर रिलीज

विकी कौशलच्या आगामी द ग्रेट इंडियन फॅमिलीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असुन चित्रपटात विकी सोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे...

Rahul sadolikar

अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारतासाठी मुकूट जिंकणारी सौंदर्यवती मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमीका असणारा चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असुन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

विकी कौशलच्या आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 

12 सप्टेंबर रोजी, यशराज फिल्म्सने विजय कृष्ण आचार्य लिखित आणि दिग्दर्शित फॅमिली ड्रामाचा ट्रेलर शेअर केला.

या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अभिनीत विकीसोबत दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे

ट्रेलरची सुरूवात

ट्रेलरची सुरुवात बलरामपूर नावाच्या एका छोट्या गावात होते, जिथे विकी कौशलने साकारलेला भजन कुमार एंट्री करतो. तो कन्हैया ट्विटर पे आजा गातो आणि त्याचे नाव सांगतो वेद व्यास त्रिपाठी. 

पिढ्यानपिढ्या बलरामपूरमध्ये राहणाऱ्या पंडित समाजाचा भाग असलेल्या आपल्या कुटुंबाची तो एक झलक देतो आणि सांगतो की या गावात आम्ही पूजा विधी करतो.

ट्रेलरमध्ये विकी सांगतो की त्याला आजपर्यंत प्रेम करण्यासाठी कुणीही सापडले नाही कारण मुली आशीर्वाद घेण्यासाठी त्याचे पाय स्पर्श करतात.

मानुषीच्या प्रेमात

इतक्यात ट्रेलरमध्ये मानुषी छिल्लर येते. विकीचं पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडतो. तो तिला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. 

इथून सर्व काही सुरळीत चालू असताना, भजन कुमार नंतर व्यत्यय आणतो आणि म्हणतो की देवाची विनोदबुद्धी देखील किती धोकादायक आहे हे गृहीत धरले जाऊ शकत नाही.

सुखी कुटूंबात मिठाचा खडा

विकीच्या घरी एक निनावी पत्र येते आणि मग त्याच्यासहित त्याच्या कुटूंबियांना तो मुस्लिम असल्याचे कळते. 

सुखी आणि समाधानी कुटूंबात मिठाचा खडा पडतो आणि भजनकुमारला आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्याच्या कुटुंबाविरुद्ध जावे लागते.

 ट्रेलरमध्ये आणखी काहीही उघड झाले नसले तरी,ट्रेलरमध्ये सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट 'वर्षातील सर्वात मोठा गोंधळ' आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली, "विकीची स्क्रीन प्रेझेन्स मॅग्नेटिक आहे. तो तुम्हाला कथेकडे सहजतेने आकर्षित करतो." दुसऱ्याने लिहिले, "विकी या भूमिकेत किती चांगला दिसतोय हे मी समजू शकत नाही. टोटल हार्टथ्रॉब!" 

चित्रपटातील कलाकार

द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा आणि भारती पेरवानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 चित्रपटातील पहिले गाणे, कन्हैया ट्विटर पे आजा काही आठवड्यांपूर्वी रिलीज झाले होते, जिथे विक्की कौशल स्टेजवर तुफान नाचताना दिसला होता आणि प्रेक्षकांनी त्याचा जयजयकार करताना दिसतात .

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

SCROLL FOR NEXT