Pakistani Girl on Jawan : 7 सप्टेंबर शाहरुख खानचा जवान रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर तुफान आले. केवळ 4 दिवसांत चित्रपटाने 500 कोटींचा विक्रमी आकडा पार केला. भारतातच नव्हे तर जवानने जगभरात जोरदार मुसंडी मारली आहे.
जवान बघुन येणारे प्रेक्षक सोशल मिडीयावर त्यांचे अनुभव आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. आता पाकिस्तानी तरुणीने तिचे तिकीटाचे पैसे परत मागितले आहेत, तिने अशी मागणी करणारा व्हिडीओही शेअर केला आहे.
जवानची कमाल आता भारतापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. सातासमुद्रापार शाहरुखचे चाहते परदेशातही 'जवान' एन्जॉय करत आहेत.
लंडनमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणीला जवान पाहताना एक विचित्र अनुभव आला आहे. चाहत्यासोबत थिएटरमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सोशल मि़डीयावर सर्वांनाच धक्का बसला आहे.
शाहरुख खानची ही महिला फॅन कराचीची असून ती लंडनमध्ये राहते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले व्हिडिओ आणि त्याच्या फॉलोअर्सची संख्या पाहता ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे हे स्पष्ट होते.
तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करुन तिने सांगितले होते की शाहरुख खानच्या चित्रपटासाठी ती खूपच उत्सुक आहे.
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओत या मुलीने असेही सांगितले की, 'थिएटरने लोकांना आधी दुसरा भाग दाखववला आणि एक तास 10 मिनिटांत सिनेमा संपला. त्यानंतर इंटरव्हल. आम्ही विचार करतोय की खलनायक मेला, आता इंटरव्हल कसा होणार.
आणि मग आम्हाला कळले की त्यांनी फक्त पाहिला भागच खेळला नाही तर मध्यंतरानंतरही त्यांनी भूमिका केली. थोडक्यात पाकिस्तानी तरुणीने सांगितल्याप्रमाणे जवान प्रेक्षकांना उलट क्रमाने दाखवल्यामुळे प्रेक्षक गोंधळले.
पाकिस्तानी तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच त्यावर कमेंट येऊ लागल्या. एका यूजरने लिहिले की, 'माफ करा, पण हे मजेदार आहे.' 'ही पीक कॉमेडी आहे,'
दुसर्याने लिहिले, 'भारतात बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एका चित्रपटाला खराब केल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवा.