Actor Vicky Kaushal and Actress Katrina Kaif  Twitter/@ThisIsReem_
मनोरंजन

विकीने कतरिनाला विचारलेल्या प्रश्नावर सलमानची रिएक्शन पाहिली का?

आजकाल कतरिना कैफ (Katrina Kaif ) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या मैत्रीबद्दल (Relationship) चर्चेत आहेत.

दैनिक गोमन्तक

आजकाल कतरिना कैफ (Katrina Kaif ) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या मैत्रीबद्दल (relationship) चर्चेत आहेत. अलीकडे हर्षवर्धन कपूरनेही (Harshvardhan Kapoor) दोघांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला होता. आता कतरिना आणि विक्की कौशलचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात सलमान खान देखील दिसला आहे. हा जुना व्हिडिओ एका अवॉर्ड फंक्शनचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विक्की कतरिना कैफला स्टेजवर विचारताण दिसला आहे की, 'आप अच्छा सा विक्की कौशल देखकर शादी क्यों नहीं कर लेतीं?'या प्रश्नावर कतरिना लाजाळूपणे हसू लागते. त्याचवेळी प्रेक्षकांच्या मधोमध बसलेला सलमान खानदेखील (Salman Khan) या दोघांवर हसू लागतो.(Vicky Kaushal asked questions on marriage to Katrina Kaif)

व्हिडिओमध्ये विकी कौशल हे सांगताना दिसला आहे की लग्नाचा सिझन चालू आहे, मला वाटलं तुमचंही मन करत असेल म्हणून मी विचारलं.या प्रश्नावर कतरिना कैफ हसली. त्याचवेळी, धाकटी बहीण अर्पिता खानच्या खांद्यावर डोके ठेवून सलमान खान डोळे मिटताना दिसला आहे. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांकडूनही बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

तुम्हाला माहित आहे का यापूर्वी एका मुलाखतीत हर्षवर्धन कपूर यांना विचारण्यात आले होते अशी कोणती अफवा आहे, जी तुम्हाला खरी वाटते, या प्रश्नावर हर्षवर्धन म्हणाले होते की, "विक्की कौशल आणि कतरिना कैफ एकत्र आहेत आणि खरं आहे. हे बोलल्यानंतर अभिनेता पुढे म्हणाला," मी यासाठी अडचणीत सापडेल काय? कदाचित. 2019 मध्ये कतरिना आणि विक्की डिनर दरम्यान एकत्र दिसले होते. यावेळी त्यांचे फटोज प्रचंड व्हायरल झाली आणि तेव्हापासून या दोघांबद्दल अफवा पसरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT