Vatsala Deshmukh Dainik Gomantak
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांच निधन झालं आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वत्सला देशमुख या प्रसिध्द अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या. विशेष म्हणजे वत्सला देशमुख यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या प्रसिध्द हिंदी चित्रपटातून केली होती. (Veteran actress Vatsala Deshmukh passes away)

दरम्यान, त्यांचे ‘फायर’, ‘नागपंचमी’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ चित्रपट चांगलचे गाजले. परंतु ‘सुहाग’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. नवरंगसह पिंजरा चित्रपटामध्ये त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यांनी अनेविध चित्रपटांमध्ये काकू, मावशी, आई, आजी अशा विविध भूमिका रंगवल्या. वत्सला देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडियावरील ट्वीटरवरुन ट्वीट करत देशमुख यांनी श्रध्दांजली वाहिली.

याशिवाय, अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्यासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रींच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून मनसे चित्रपट कर्मचारी पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली, अशा शब्दांमध्ये अमेय खोपकरांनी श्रध्दांजली वाहीली आहे. ‘पिंजरा’ चित्रपटामध्ये वत्सला देशमुख यांनी खलनायिकेकडे झुकणारी भूमिका रंगवली होती. पिंजरा चित्रपटातील भूमिका सोडली तर त्यांच्या अभिनय प्रवासात त्यांनी सकारात्मक भूमिकाच साकारल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाने गारुड निर्माण केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT