Urfi Javed Bella Hadid  Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed Lungs Dress: उर्फीने केली कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकची कॉपी

फुफ्फुसांसारखा दिसणाऱा ड्रेस घालून उतरली मुंबईच्या रस्त्यांवर; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

गोमन्तक डिजिटल टीम

Urfi Javed Lungs Dress: बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमातून नावारूपाला आलेली आणि त्यानंतर चित्रविचित्र पोशाखांतून चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा तिच्या नव्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. पण अशाच पद्धतीचा ड्रेस कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यापुर्वी परिधान केला गेला होता, त्यावरून उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत राहते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण तरीही ती कपड्यांसोबत आणि एकूणच फॅशनबाबत प्रयोग करायला विसरत नाही. नुकतेच ती एका अशाच विचित्र अवतारात मुंबईत दिसून आली. तिचा हा ड्रेस खरंच खास आहे, कारण त्यातून एक संदेश दिला गेला आहे.

उर्फीचा या ड्रेससोबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तथापि, नेटकऱ्यांकडून तिचे कॉपी कॅट म्हणून ट्रोलिंग केले जात आहे. उर्फीने यात फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस घातला आहे. हा बॅकलेस टॉप आहे. तर त्यासोबत बॅगी पँट आणि पोनी टेल असा लूक केला आहे. तथापि, अशाच पद्धतीचा पोशाख 2021 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर मॉडेल बेला हदीदने परिधान केला होता.

त्यामुळे उर्फीला कॉपी कॅट म्हटले जात आहे. तथापि, उर्फीने मात्र या टॉपद्वारे नो स्मोकिंग असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.या लुकवर इन्स्टाग्रामवर अनेक युजर्स व्यक्त झाले आहेत. या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.

तर त्यावर एकाने तुच आजच्या पिढीसाठी धोकादायक आहेस, असे म्हटले आहे. तर अनेकांनी तिच्या लूकची स्तुतीही केली आहे. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फी ही इंटरनेट सेन्सेशन झाली असून याआधीदेखील वारंवार नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. उर्फीचा हा व्हिडिओ व्हायरलही झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

Goa Live News: गोवा पोलीस दलात पदोन्नती; अजय कृष्ण शर्मा बनले 'आयजीपी', तर राहुल गुप्ता यांचीही बढती

Goa ZP Election: मतदानाला सुट्टी मिळाली नाही! नागरिक संतप्त; कारवाई करण्याची होतेय मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ‘माझे घर’चे गाजर

Shubhman Gill Dropped: '..या कारणासाठी शुभमनला वगळले'! अजित आगरकरने सांगितले धक्कादायक कारण; उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे

SCROLL FOR NEXT