Shruti Haasan: 'या' आंतरराष्ट्रीय सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात श्रृती करणार काम

इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली माहिती, मार्क राऊलीसोबत स्क्रीन शेअर करणार
Shruti Haasan
Shruti Haasan Dainik Gomantak
Published on
Updated on

Shruti Haasan: अभिनेत्री श्रृती हासन आता एका आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रोजेक्टशी जोडली गेली आहे. द आय असे या चित्रपटाचे नाव असून डॅफने शमॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. श्रृतीने स्वतःच इन्स्टाग्राम पोस्टमधून ही माहिती दिली आहे.

Shruti Haasan
Top 5 Richest Actresses: 'या' आहेत बॉलीवुडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री

श्रृतीने या पोस्टमध्ये या चित्रपटविषयक बातमीही शेअर केली आहे. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून यात 'द लास्ट किंग्डम'वाल्या मार्क राऊली याचीही प्रमुख भूमिका आहे.

श्रृतीने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका प्रेमळ टीमसोबत 'द आय'चा भाग होणे हे प्रचंड आनंददायी आहे. गोष्टी सांगणे ही या जगातली माझी सर्वात आवडती गोष्ट आहे, आणि त्या गोष्टीचा भाग बनणे हे अत्यंत सुंदर आहे... मला याचा भाग बनविल्याबद्दल डॅफने शमॉन आणि एमिली कालर्टन यांचे आभार. या दोघींसमवेत सुपरटॅलेंटेड मार्क राऊली अशी सर्व टीमच मस्त आहे

श्रृती नुकतीच 'ट्रेडस्टोन' या अमेरिकन सीरीजमध्ये दिसली होती. ही सीरीज हॉलीवूड अभिनेता मॅट डेमन याच्या 'जेसन बोर्न' युनिव्हर्समध्येच सेट केली गेलेली आहे.

Shruti Haasan
Janhvi Kapoor's Dating Tips: कधीही 'या' व्यक्तीला डेट करू नको; जान्हवीने बहिण खुशीला दिल्या डेटिंग टिप्स

एमिली कार्लटन हीने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. एका तरूण विधवा महिलेची कहाणी यात आहे. तिच्या पतीचा ज्या बेटावर मृत्यू होतो तिथेपर्यंतचा तिने त्याचे अस्थीविसर्जन करण्यासाठी केलेला प्रवास यात दाखवला आहे. या चित्रपटात अॅना साव्वा, लिंडा मार्लो, ख्रिस्तोस स्टर्गिग्लो यांच्याही भूमिका आहेत. अथेन्स आणि कोरफु येथे पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या शुटिंगला सुरवात होणार आहे.

दरम्यान, श्रृती आगामी काळात प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या चित्रपटामध्ये प्रभाससोबत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com