Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

Twinkle Khanna Video: शाहरुखच्या 'जादू तेरी नजर' या गाण्यावर ट्विंकल खन्नाचा अनोखा अंदाज...

Twinkle Khanna on Shahrukh Khan Song: ट्विंकल खन्नाने एक नवीन छंद जोपासला आहे, ज्याचा व्हिडिओ शेअर करून तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना जरी अभिनयाच्या दुनियेत जास्त दाखवू शकली नसली तरी लेखिका म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. लेखिका आणि अभिनेत्री असण्यासोबतच ती एक फिल्म प्रोड्यूसर आणि इंटिरियर डिझायनर देखील आहे. पण तीची ही कौशल्ये पुरेशी नाहीत, असे दिसते, म्हणून तिने आणखी एक कला शिकून तिच्या चाहत्यांना त्याची झलक दाखवली.(Twinkle Khanna on Shah rukh Khan Song News)

ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या गिटार वाजवायला शिकत आहे, ज्यामध्ये तिने प्रभुत्व मिळवले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शाहरुख (Shah rukh Khan) खान स्टारर 'डर' चित्रपटामधील 'जादू तेरी नजर' गाण्याची (Song) ट्यून वाजवताना दिसत आहे.


व्हिडिओ (Video) शेअर करत ट्विंकल खन्ना म्हणाली की नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वय नसते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “नवीन कौशल्य शिकण्यास कधीही उशीर झालेला नाही. मी ठरवलं की मी गिटार वाजवायला शिकायचं. एक दिवस मीही त्यात माहिर होणार."

'पॅडमॅन' या सुपरहिट चित्रपटाची (Movie) निर्मिती करताना ट्विंकल खन्नाने तिच्या करिअरमध्ये 'दिल तेरा दिवाना', 'मेला', 'जुल्मी', 'इतिहास' आणि 'बादशाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ट्विंकलने 'पायजामा आर फॉरगिव्हिंग', 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' आणि 'मिसेस फनीबोन्स' यासह अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. अलिकडेच तिने तिच्या 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकातून 'सलाम नोनी आप्पा' या लघुकथेवर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT