'हिरामंडी'साठी संजय लीला भन्साळींनी घेतलेलं मानधन ऐकून व्हाल थक्क

नेटफ्लिक्सने 'हिरामंडी' प्रोजेक्टमध्ये 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela BhansaliDainik Gomantak
Published on
Updated on

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासाठी 'हिरामंडी' प्रोजेक्ट खूप खास आहे. गेल्या वर्षीच OTT प्लॅटफॉर्म Netflix ने या चित्रपटाची घोषणा केली होती. हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या प्रकल्पाची निर्मिती करणार आहे. आता बातम्या येत आहेत की नेटफ्लिक्स या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर एकट्या संजय लीला भन्साळी 65 कोटी रुपये घेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेच सांभाळणार आहेत. (Sanjay Leela Bhansali likely to charge 60 crores for hiramandi film)

Sanjay Leela Bhansali
Russia-Ukraine युद्धादरम्यान प्रियंका चोप्राची मुलांसाठी भावनिक पोस्ट

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने 'हिरामंडी' प्रोजेक्टमध्ये 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, "संजय लीला भन्साळी यांना दिग्दर्शनासाठी सुमारे 60-65 कोटी रुपये दिले जातील. उर्वरित 200 कोटी रुपये कलाकार आणि निर्मिती खर्चासाठी वापरले जातील." हा चित्रपट मल्टीस्टारर असणार आहे. या चित्रपटासाठी बाकी कलाकार किती पैसे घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Sanjay Leela Bhansali
भारताच्या श्रेयाने रचला इतिहास, कोरियन बँडमध्ये सहभागी होणारी ठरली पाचवी सदस्य

संजय लीला भन्साळीच्या या प्रोजेक्टसाठी सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, हुमा कुरेशी आणि ऋचा चढ्ढा यांनी फी कमी केली असून ती दिग्दर्शकासोबत काम करण्यात रस दाखवत असल्याच्याही बातम्या येत आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पासाठी मुमताजशी संपर्क साधल्याचे वृत्त यापूर्वी आले होते.

'हिरामंडी'बद्दल बोलताना संजय लीला भन्साळी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, चित्रपट निर्माता म्हणून माझ्या प्रवासातील हिरामंडी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे.मी Netflix सह भागीदारी करण्यास उत्सुक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com