Devoleena Marriage Dainik Gomantak
मनोरंजन

Devoleena Marriage: टीव्हीवरील 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने जिम ट्रेनरसोबत बांधली लग्नगाठ; नेटकऱ्यांना मात्र प्रँकचा संशय

दोन वर्षे सुरू होती रिलेशनशिप, सोशल मीडिया पोस्टमधून दिली माहिती

Akshay Nirmale

Devoleena Bhattacharjee Marriage: टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही अखेर विवाहबंधनात अडकली आहे. देवोलीनाच्या पतीचे नाव शाहनवाज शेख आहे. शाहनवाज हा जिम ट्रेनर आहे. या दोघांचीही पहिली भेट जिममध्ये झाली होती. दोघेही जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पती शाहनवाजसोबतचा फोटो शेअर करत देवोलीनाने सोशल मीडियात लिहिले आहे की, 'होय, आता मी अभिमानाने सांगू शकते की मी विवाहित आहे. मी दिवा लावूनही शोधले असते तर मला तुझ्यासारखा कोणी सापडला नसता. तू माझ्या प्रार्थनांचा प्रसाद आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. तुमच्या प्रार्थनेत आम्हाला लक्षात ठेवा.

देवोलिनाने मंगळवारी रात्रीच तिच्या हळदी समारंभाचे फोटोज सोशल मीडियात शेअर केले होते. यावेळी 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील मधला देवालिनाचा सहकलाकार विशाल सिंगही उपस्थित होता. त्यानंतर देवोलीनाने तिचा ब्राइडल लूकदेखील चाहत्यांना दाखवला होता. देवोलीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती नववधूच्या रूपात अत्यंत सुंदर दिसत आहे. हातावर काढलेली मेहंदीही तिने फोटोतून दाखवली आहे. यापुर्वी देवोलीना तिचा कथित बॉयफ्रेंड असलेल्या टीव्ही अभिनेता विशाल सिंगसोबत लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

दरम्यान, देवोलीनाने याआधी विशाल सिंहसोबतच्या तिच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे या दोघांची एंगेजमेंट झाल्याचे मानले जात होते. पण तो व्हिडिओ शेअर करत देवोलीनाने 'हे अधिकृत आहे.' मात्र, काही दिवसांनंतर दोघांनी त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओसाठी हा प्रँक केल्याचे समोर आले होते, त्यामुळे तिचे हे लग्न तरी खरे आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT