Boycott Deepika-SRK Film: गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु आहे, ज्याचा परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर स्पष्टपणे दिसून येत आहे. आता सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर तेच वारे वाहत आहे.
दरम्यान, शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत रिलीज होणार आहे. नुकतेच 'बेशरम रंग' (Besharam Rang) चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan) धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. परंतु पहिले गाणे रिलीज झाल्यानंतरच लोक दीपिका पदुकोणला ट्रोल करत आहेत.
दीपिकाच्या कपड्यांवरुन गोंधळ
पठाणच्या 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाचा हॉट आणि सिझलिंग लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गाण्यातील तिच्या स्टेप्स आणि आउटफिटवरुन काही लोक दीपिकाला प्रचंड ट्रोल करत आहेत. यानंतर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियावर (Social Media) गदारोळ सुरु झाला आहे.
वास्तविक, दीपिकाने भगव्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. मोनोकिनीच्या रंगावरुन सर्वत्र खळबळ उडाली आहे. पठाणचे 'बेशरम रंग' हे गाणे 12 डिसेंबर रोजी रिलीज झाले आहे, ज्यामध्ये दीपिकाच्या लूकने सर्वांनाच वेड लावले आहे. पण या गाण्यात दीपिकाच्या ऑरेंज मोनोकिनीवरुन गदारोळ झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात भगवा रंग वापरणे हिंदू धर्माचा अपमान असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एका पोस्टद्वारे गाण्यातून दीपिकाच्या कपड्यांचा रंग बदलण्याची सूचना केली आहे. तसे झाले नाही तर 'पठाण' एमपीमध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता पठाणचे निर्माते 'बेशरम रंग'मध्ये काय बदल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच, शाहरुख खानमुळेच 'पठाण' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. याआधी शाहरुख कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत 'झिरो' चित्रपटात दिसला होता. याशिवाय, शाहरुखच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, 'पठाण' नंतर शाहरुख 'जवाब' आणि 'डंकी' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.