Avtar 2: 'आरआरआर'च्या कमाईपेक्षा दुप्पट बजेट असलेला 'अवतार 2' येतोय...

भारतात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 7 कोटींहून अधिक कमाई
Avtar 2
Avtar 2Dainik Gomantak
Published on
Updated on

Avtar 2: जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार' हा 2009 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जगभरातील चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 20 हजार कोटी रूपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल 'अवतार 2 : वे ऑफ वॉटर' येत आहे. या चित्रपटाचे बजेटच तब्बल 1954 कोटी रूपये असून हा चित्रपट येत्या 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Avtar 2
Aryan Khan New Business: आर्यन खानचा नवा 'उद्योग'; घेऊन येतोय 'व्होडका'चा नवा ब्रँड

'अवतार 2 : वे ऑफ वॉटर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येही अनेक कोटींची कमाई केली आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला 'अवतार' भाग एक सुमारे 237 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये (तब्बल 1954 कोटी रूपये ) बनविला गेला होता आणि या चित्रपटाने जगभरात 20 हजार 368 कोटींचे कलेक्शन केले होते. त्याच वेळी, 'अवतार 2 द वे ऑफ वॉटर' 250 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय रूपयांत या चित्रपटाचे बजेट होते 2062 कोटी रूपये.

म्हणजेच 'अवतार 2 द वे ऑफ वॉटर'चे बजेट एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाच्या कमाईपेक्षाही दुप्पट आहे. 'आरआरआर' या चित्रपटाची भारतात खूप चर्चा झाली होती. शिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह सॅटेलाईट हक्क, विविध भाषांतील हक्क, ओटीटीवरील हक्क अशा विविध मार्गांनी कमाईचे वेगवेगळे विक्रम नोंदविले होते. या चित्रपटाने एक हजार कोटींहून अधिकची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. तर 'अवतार 2'चे बजेट आहे जवळपास दोन हजार कोटींहून अधिक.

Avtar 2
Samantha Ruth Prabhu: माझी अनेक अफेयर्स होती, माझे अनेक गर्भपात झाले...

दरम्यान, भारतीय प्रेक्षकांनीही 'अवतार 2' च्या आगाऊ बुकिंगमध्ये मोठा उत्साह दाखवला आहे. देशात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 2 लाख तिकिटांची विक्री झाली आहे. या अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने 7 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात सॅम वर्थिंग्टन, झोई सालडाना, केट विन्सलेट, स्टीफन लँग, विन डीझेल यांच्या भुमिका आहेत. जेम्स कॅमेरॉन यांनी यापुर्वीच 'अवतार 3' 'अवतार 4' आणि 'अवतार 5'ची देखील घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com