Tunisha Sharma Suicide case Dainik Gomantak
मनोरंजन

Tunisha Sharma Suicide case : तुनिषावर मुस्लिम बनण्यासाठी दबाव टाकला जात होता? तुनिषाची आई म्हणते..

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला आता लव जिहादचं वळण मिळतं की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ;कारण तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझ्या मुलीवर मुस्लीम बनण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं धक्कादायक विधान तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी केलं आहे.त्यामुळे हे प्रकरण 'लव जिहाद'कडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शीजान आणि त्याच्या घरचे तुनिषावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही वनिता शर्मा यांनी केला आहे. यापुढे त्यांनी शीजानचं दुसरीकडे अफेअर सुरू होते, आणि त्या मुलीचा मॅसेज आल्यावरच दोघांचं ब्रेक- अप झालं असंही त्या म्हणाल्या.

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता धार्मिक वळण मिळणार असेच दिसते. या सगळ्या गोष्टी वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितल्या आहेत.

या पत्रकार परिषदेत वनिता शर्मा यांनी काही धक्कादायक आरोपही केले आहेत. त्या म्हणाल्या तुनिषावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, शीजानच्या घरचे सगळेच तीच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. शीजानच्या बहिणी तुनिषाला घेऊन दर्गाहमध्ये जायच्या. शीजानने एकदा तुनिषाच्या कानाखाली वाजवली होती. शीजानच्या फोनमध्ये एका मुलीचे मॅसेजेस बघितले आणि त्यांच्यात वाद झाले. यावर ''तुला काय करायचं ते कर'' असं शीजान म्हणाला अशी माहिती वनिता शर्मा यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT