'तन मन धन' से बढकर 'जण गणं मन ' म्हणत जॉनचं पुन्हा देशप्रेम Dainik Gomantak
मनोरंजन

'तन मन धन' से बढकर 'जण गणं मन ' म्हणत जॉनचं पुन्हा देशप्रेम

'सत्यमेव जयते 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमध्ये (Bollywood) जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जाणारा हिरो म्हणून जॉन अब्राहम (John Abraham) या अभिनेत्याचे नाव आपल्या ओठांवर येते. 'सत्यमेव जयते' या चित्रपटाचा सिक्वेल 'सत्यमेव जयते2' (Satyameva Jayate 2) चा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जवेरी यांनी केले. या चित्रपटात जॉन अब्राहमसह दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट अॅक्शनने भरलेला आहे असे वाटते. यात जॉन हा विरेंद्र राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जॉन भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देताना दिसणार आहे. जवळजवळ दीड वर्षाच्या निर्मिती आणि रिलीजच्या विलंबानंतर हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे.

'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये दिव्या शेकऱ्यांच्या प्रश्नासाठी पोलिसांशी लढताना दिसणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यमेव जयते' चित्रपटामध्ये भ्रष्टाचाराचा कसा सामना केला जातो हे दाखवण्यात आले होते. तर सत्यमेव जयते 2 मध्ये अनेक मुद्दे सविस्तरपणे दाखवले आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT