Ganpath box office collection day 1  Dainik Gomantak
मनोरंजन

Ganpath : 'गणपत'ची बॉक्स ऑफिसवरची सुरुवात निराशाजनक

अभिनेता टायगर श्रॉफच्या 'गणपत' बॉक्स ऑफिसवरची सुरुवात मोठ्या निराशेनेच केली आहे.

Rahul sadolikar

Ganpath box office collection day 1 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. गणपतच्या हाय व्होल्टेज ड्रामाची टायगरचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते.

गणपत थिएटर्समध्ये रिलीज झाला खरा पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवण्यात अपयश आल्याचे दिसले. चला पाहुया गणपतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

टायगर श्रॉफ, क्रिती सेनन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी सिनेमा गणपतमुळे चर्चेत होते. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर टायगरचे चाहते या सिनेमासाठी खुप उत्सुक होते. काल 20 ऑक्टोबर रोजी गणपत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सोशल मिडियावर या चित्रपटाची चर्चा होती.

एकीकडे टायगर आणि क्रितीच्या चाहत्यांना हा सिनेमा खुप आवडला तर दुसरीकडे समिक्षकांचा या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद होता. या सिनेमात फक्त अॅक्शन असून चित्रपटाला स्टोरीच नाही अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली होती.

150 ते 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना खुप जास्त अपेक्षा होत्या. मात्र आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता या चित्रपटाला फारच निराशाजनक ओपनिंग मिळाली असल्याचे दिसत आहेत.

गणपतची कमाई

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'गणपत' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 2.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईकडे पाहता 'गणपत' हा टायगरच्या करिअरमधील सर्वात खराब ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

टायगरच्या इतर चित्रपटांचे ओपनिंग

टायगरच्या आधीच्या चित्रपटाच्या कमाईकडे पाहिले असता त्याच्या 'हिरोपंती 2' ने पहिल्या दिवशीची कमाई 6.50 कोटी आणि 'बागी 3' ने 17 कोटींची कमाई केली होती.

तेच त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटवर नजर टाकली असता त्याच्या 'वॉर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.35 कोटींची आणि 'स्टुडंट ऑफ द इयर 2'ने 12.06 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे त्याच्या गणपत या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई खुपच खराब आहे, आता हे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आहे तर वीकेंडला शनिवार आणि रविवार आणि सुट्टीचा फायदा या चित्रपटाला मिळेल अशी आशा टायगरच्या चाहत्यांना आणि निर्मात्यांना आहे.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT