Tiger Shroff Instagram/@Tiger Shroff
मनोरंजन

टायगर श्रॉफने केला हृतिक रोशनच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स

दरम्यान, टायगर श्रॉफचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये तो हिल्समध्ये हृतिक रोशनच्या स्टाईलमध्ये स्विंग करताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर त्याचा आवडता अभिनेता हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटातील 'चोरी चोरी चुपके चुपके' गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो हृतिक रोशनच्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहे.

(Tiger Shroff dances to Hrithik Roshan's popular song)

हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत टायगर श्रॉफने सांगीतले आहे की, तो जिथे आहे तिथे डान्स करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "या दृश्याने आणि जागेने मला माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक #KrrishVibes वर नाचायला लावले!"

व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफची मस्क्युलर बॉडी पाहून त्याच्या लूकने सगळेच भारावून गेले. तो डोंगर दऱ्यांमध्ये शर्टलेस डान्सच्या अदा करताना तसेच क्लिपमध्ये, अभिनेता कर्व्ही बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

(Bollywood News)

टायगर श्रॉफच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते त्याच्या डान्स आणि लूकचे खुलेपणाने कौतुक करत आहेत. कोणी त्याला सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणत आहेत तर कोणी त्याला बॉलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता म्हणत आहेत. याशिवाय चाहते त्याच्या पोस्टवर हार्ट, फायर आणि इतर इमोजी शेअर करून प्रतिक्रिया देत आहेत.

आता टायगरच्या प्रोफेशनल कामाबद्दल बोलायचे झाले तर आगामी काळात टायगर अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच टायगर-अक्षय एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटानंतर टायगर कृती सेननसोबत 'गणपथ-2' चित्रपटात दिसणार आहे. टायगर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारियासोबत हिरोपंती 2 मध्ये शेवटचा दिसला होता. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT