Actress Bhumi Pednekar Dainik Gomantak
मनोरंजन

म्हणून भूमी पेडणेकर रुग्णालयात दाखल...स्वत: फोटो शेअर करुन दिली माहिती

भूमीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत डेंग्यू झाल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. त्याचसोबत तिने चाहत्यांना मच्छरांपासून सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे

Rahul sadolikar

Actress Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर काही काळापूर्वी थँक्स फॉर कमींगसाठी चर्चेत होती. या चित्रपटात अनेक कलाकारांसोबत भूमीने केलेलं काम अनेकांची मनं जिंकून गेलं. आता भूमी एका व्हायरल फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकरांच्या (Bhumi Pednekar) चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भूमी पेडणेकरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. भूमीला डेंग्यूची लागण झाली असून गेल्या ८ दिवसांपासून तिला त्रास होत होता. सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. भूमीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत डेंग्यू झाल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. त्याचसोबत तिने चाहत्यांना मच्छरांपासून सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे

भूमी पेडणेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेली भूमी पेडणेकर आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. भूमीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डेंग्यूच्या एका डासाने मला ८ दिवस खूप त्रास दिला. पण आज जेव्हा मी उठले तर मला जरा बरे वाटले. त्यामुळे सेल्फी घेण्याचा विचार केला.'

भूमी म्हणाली

तसंच, 'मित्रांनो... तुम्ही सर्व सावध रहा. गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. मच्छर प्रतिबंधकचा वापर करा. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती खराब झाली आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना डेंग्यूचा त्रास झाला आहे. या विषाणूमुळे परिस्थिती आणखी बिघडली. माझी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार.', असं या पोस्टमध्ये भूमीने लिहिले आहे.

इन्स्टा स्टोरी

भूमी पेडणेकरने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच अशक्त दिसत आहे. भूमीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आणि त्यांनी अभिनेत्रीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ते भूमीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान,

थँक्स फॉर कमींग

भूमी पेडणेकर शेवटी 'थँक्स फॉर कमिंग' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत शहनाज गिलने देखील काम केले आहे. कंटेंटमुळे हा चित्रपट अनेकदा ट्रोलही झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT