Miss World 2023 in India Dainik Gomantak
मनोरंजन

Miss World 2023 in Goa: क्या बात है ! मिस वर्ल्ड यंदा गोव्यात होणार...

Rahul sadolikar

Miss World 2023 in Goa: मिस वर्ल्ड ही स्पर्धा एक मानाची आणि मोठी परंपरा असलेली मानली जाते. जगभरातल्या सौंदर्यवती या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. मिस वर्ल्डची यंदाची स्पर्धा भारतीयांसाठी खास असणार आहे.

यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. भारत मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे, कारण प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा सुमारे तीन दशकांनंतर देशात परतत आहे.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने 8 जून रोजी जाहीर केले की भारत सुमारे तीन दशकांंनंतर 71 व्या मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन करेल.

स्पर्धा होणार गोव्यात

मिस वर्ल्डची हीच मोठी घोषणा करण्यासाठी, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांच्यासह मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्का गुरुवारी नवी दिल्लीत आल्या आणि उद्घाटनाच्या पत्रकार परिषदेला त्यांनी हजेरी लावली. भारतासाठी नक्कीच ही एक मोठी बातमी आहे.

मिस वर्ल्डची यंदाची ही स्पर्धा गोव्यात होणार असुन मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा मोर्ले यांनी यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री

Miss World 2023

मिस वर्ल्ड 2022, कॅरोलिना बिएलॉस्का म्हणाली

कॅरोलिना बिएलॉस्का म्हणाली "71व्या मिस वर्ल्ड 2023 सह भारताने जगाचे खुल्या हातांनी स्वागत करण्याची तयारी केली आहे आणि देशाचे सहकार्य, सौंदर्य आणि प्रगतीशील भावना सर्वांना दाखवुन दिली आहे.

बदल घडवून आणण्यासाठी महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्यात आमच्यासोबत सामील व्हा, कारण आम्ही एकत्र या असाधारण प्रवासाला सुरुवात करतोय, ". 

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा मोर्ले म्हणाल्या

"71व्या मिस वर्ल्ड फायनलचे नवे घर म्हणून भारताची घोषणा करताना मला आनंद होत आहे! 30 वर्षांपूर्वी या अतुलनीय देशाला भेट दिल्याच्या पहिल्या क्षणापासूनच मला भारताबद्दल खूप आपुलकी आहे.

तुमची अनोखी आणि विविधता असणारी माहिती शेअर करण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आणि उर्वरित जगासह चित्तथरारक ठिकाणे आम्ही शेअर करु."

मोर्ले पुढे म्हणाल्या

मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १३० देशांपेक्षा अधिक देशांमधून स्पर्धक भारतामध्ये येणार आहेत आणि आपली प्रतिभा सर्वांसमोर सादर करतील. यादरम्यान प्रत्येक स्पर्धक आपल्या देशाची संस्कृती, सौंदर्य दर्शवून परीक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील.

तसंच यामध्ये टॅलेंट शोकेस, खेळांचे आव्हान आणि चॅरिटीशी संबंधित अनेक गोष्टींचाही समावेश असेल. यावेळी भारतात होणाऱ्या स्पर्धेबाबत जुलिया मोर्लेदेखील अत्यंत उत्साही दिसून आल्या.

भारताने 6 वेळा ही स्पर्धा जिंकली

त्या म्हणाल्या मी डॉ सय्यद जफर इस्लामचे देखील आभार मानू इच्छितो की त्यांनी हे शक्य करण्यात मदत केली आहे,” त्या पुढे म्हणाल्या. 130 हून अधिक देशांतील स्पर्धक त्यांची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि करुणा दाखवण्यासाठी भारतात जमतील. भारताने सहा वेळा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे, पहिली 1966 मध्ये. मानुषी छिल्लर सहावी मिस इंडिया वर्ल्ड बनली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT