गेल्या काही काळात ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातल्य़ा कलाकारांच्या लूकवरही सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. राम-सीता आणि या पात्रासाठी अजुन एक जोडी तयारी करत आहे.
एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा 'रामायण' हा चित्रपटही चर्चेत आहे. वास्तविक, या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठे अपडेट आले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
'आदिपुरुष'मध्ये प्रभास रामची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन सीतेची, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. या तीन पात्रांची कथा आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये पाहायला मिळणार आहे.
याआधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट सध्या थांबवण्यात आला आहे, परंतु रिपोर्ट्सनुसार, 'रामायण'चे शूटिंग आता डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे.
'पिंकविला'च्या वृत्तानुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये माँ सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. जरी याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
आलिया भट्टने नुकतीच नितेश तिवारी यांची भेट घेतली, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. याच व्हिडिओनंतर आलियाला नितेशने सीतेच्या भूमिकेसाठी साइन केल्याची चर्चा सुरू झाली.
रामायण' आणि त्यातील कलाकारांबद्दलच्या बातम्यांनुसार रणबीर कपूर गेल्या काही आठवड्यांपासून डीएनईजी ऑफिसमध्ये (व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन स्टुडिओ) येताना आणि जाताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'रामायण' कुठपर्यंत पोहोचले आहे हे पाहण्यासाठी रणबीर इथे येत राहतो.
‘रामायण’ चित्रपटाचे जग कसे असावे याचे प्री-व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे. आता टीम भगवान रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लुक टेस्ट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर त्याचा परफेक्ट लूक पाहण्यासाठी स्टुडिओला वारंवार भेट देत आहे. आणि मग त्यानुसार रणबीर त्याच्या अंगावर काम करेल.
आलिया भट्टने आरआरआरमध्ये सीतेची भूमिका खूपच सुंदररीत्या साकारली आहे. तेव्हापासून चाहते सीता माँच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला पहिली पसंती मानू लागले. आता चाहत्यांची ही इच्छा 'रामायण'मध्ये पूर्ण होणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर आणि आलिया ज्या ऑफिसला सतत भेट देत होते, त्या ऑफिसचे नाव 'रामायण' ठेवण्यात आले आहे. येथूनच नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने 'रामायण'चे विश्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर भगवान राम बनणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशचे नाव पुढे येत आहे.
काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की रावणच्या भूमिकेसाठी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यशसोबत चर्चा करत आहेत. यश या चित्रपटासाठी तयार असून, त्याने रावणाच्या भूमिकेत रस दाखवल्याचे बोलले जात आहे.
यशने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही. पण यश लवकरच 'रामायण' साइन करेल असा विश्वास मधु मंतेना यांना आहे. अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा 'रामायण'ची निर्मिती करत आहेत.
तर 'दंगल' फेम नितेश तिवारी व्यतिरिक्त रवी उदयवार याचे दिग्दर्शन करणार आहेत. हे पॅन इंडिया 2025 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.