The Kerala Story Box Office Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story Box Office : तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर केरळ स्टोरीचं कमाईचं वादळ घोंगावतंय...

द केरळ स्टोरी या चित्रपटाने पहिल्या दिवसापासुन बॉक्स ऑफिसवरची पकड चांगलीच घट्ट केली आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन वाद-विवादाच्या केंद्रस्थानी असणारा द केरळ स्टोरी बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाणं घेत आहे. अदा शर्मा स्टारर चित्रपट 'द केरळ स्टोरी' यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. ISIS भरतीमध्ये महिलांचे धर्मांतर होण्याच्या वेदनादायक कथेवर आधारित, सुदीप्तो सेनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. 

तिसऱ्या सोमवारी म्हणजेच 18 व्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

केरळ स्टोरीचा बॉक्स ऑफिसवर कल्ला

The Kerala Story Collection Day 18: 'The Kerala Story' ने 17 व्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि चित्रपटाचे आकर्षण लवकरच संपणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या 18 व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. 

Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी 5.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशाप्रकारे, चित्रपटाने 17 दिवसांत 181.47 कोटींची कमाई केली होती आणि 18व्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाने देशभरात 186.97 कोटींची कमाई केली आहे.

आजवरचे कलेक्शन

दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन - शुक्रवार 80.36 कोटी रुपये
15व्या दिवशी कलेक्शन - 05.50 कोटी रुपये
शनिवार, 16व्या दिवशी कलेक्शन - 08.50 कोटी रुपये
रविवार, 17व्या दिवसाचे कलेक्शन - रु 10.00 कोटी
सोमवार, 18व्या दिवसाचे कलेक्शन - रु. 5.50 कोटी

186.97 कोटी

200 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच...

सोमवारी 'द केरळ स्टोरी'ची व्याप्ती 15.58% होती असे सांगितले जात आहे. हा चित्रपट हळूहळू पण निश्चितपणे 200 कोटींच्या जवळ आहे. मात्र, चित्रपटाला 200 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल असे दिसते. तसे, 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे.

चित्रपटाचा वाद अन् दिग्दर्शकाने सादर केला पुरावा

केरळ स्टोरीची गोष्ट काल्पनिक आहे अशी टीका करणाऱ्यांना उत्तर म्हणून रंगशारदा भवन, वांद्रे पश्चिम येथे 17 मे रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एका मोठ्या सभागृहावर काही स्थानिक पोलिस आणि अंगरक्षकांसह सर्व क्षेत्रातील माध्यमांचे प्रतिनिधी यासाठी पहारा होता.

स्टेजवर सहसा 7 ते 8 खुर्च्या ठेवल्या जातात ज्यात चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि क्रू यांचा समावेश आहे, परंतु ते तेथे सुमारे 32 खुर्च्या पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. स्टेजवर एवढ्या संख्येने खुर्च्या का ठेवल्या आहेत, हे कोणालाच कळत नव्हते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

SCROLL FOR NEXT