surekha sikri Dainik gomantak
मनोरंजन

Surekha Sikri Death: 'बालिका वधु' फेम 'दादीसा' काळाच्या पडद्याआड

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 75 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 75 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. बधाई हो आणि बालिका वधू सारख्या टीव्ही शोसह चित्रपटांमध्ये दिसलेल्या सिक्रीला 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आणि 2018 च्या सुरूवातीला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. (Television Actress Surekha Sikri dies of cardiac arrest aged 75)

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या दरम्यान आज त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना बालिका वधू या मालिकेत अत्यंत करारी भुमिका निभावली होती. आणि त्या खूप फेमस होवून रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या होत्या.

यूपीमध्ये जन्मलेल्या सुरेखाने आपले बालपण अल्मोडा आणि नैनितालमध्ये घालवले. या अभिनेत्रीने अलिगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले. यानंतर त्या दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाल्या. सुरेखा यांना 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. सुरेखा सिक्री यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सुरेखा सिक्री यांनी बधाई हो आणि बालिका वधू सारख्या अनेक हिट आणि लोकप्रिय मालिकांमध्ये यादगार भूमिका साकारल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT