Teja Sajja Dainik Gomantak
मनोरंजन

Teja Sajja: '... तर माझी दृष्टी कायमची गेली असती,' तेजा सज्जाने केला मोठा खुलासा

Teja Sajja: हा चित्रपट प्रेम, कष्ट आणि प्रामाणिकपणाचं फळ असल्याचं तेजाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Teja Sajja: सध्या हनुमान हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक घटना समोर आली आहे. तेजा सज्जा या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने हा खुलासा केला आहे की,त्याने त्याच्या पात्रासाठी लाल लेन्स वापरला, ज्यामुळे त्याच्या कॉर्नियावर ओरखडे आले. डोळ्यांना हानी पोहोचवणारी धूळ आणि छोटे दगडही भरपूर होते. तेजा म्हणाला की ते खूप वेदनादायक होते. दृष्टीला इजा पोहचण्याचीदेखील शक्यता होती. परंतु डोळ्याला कोणतीही हानी पोहचण्याआधीच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो पुढे असे म्हणतो की, अनेक आव्हाने असूनही चित्रपटाच्या शूटचा प्रत्येक मिनिट आवडत असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट प्रेम, कष्ट आणि प्रामाणिकपणाचं फळ असल्याचं तेजाने म्हटले आहे.

चित्रपटाच्या बॉक्स-ऑफिस यशाबद्दल बोलताना, तेजाने खुलासा केला की चित्रपटाने 100 कोटी रुपये आधीच ओलांडले आहेत आणि अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

या मुलाखतीदरम्यान, तेजा म्हणाला की त्याचा पूर्वीही देवावर विश्वास होता पण 'हनुमान' चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याचा देवावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देवाने साथ दिल्याचे त्याने सांगितले. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी 'हनुमान' चित्रपटाद्वारे सुपरहिरोच्या विश्वात पहिले पाऊल ठेवले आहे. 'मेरी ख्रिसमस' आणि 'गुंटूर करम' सारख्या मोठ्या चित्रपटांशी टक्कर असूनही, हा चित्रपट जगभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT