Tanushree Dutta on Rakhi Sawant Dainik Gomantak
मनोरंजन

Tanushree Dutta: "राखी सावंतला पुरुषांमध्ये रस नाही " अभिनेत्री तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप...

Tanushree Dutta on Rakhi Sawant: अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंतवर जोरदार निशाणा साधत तिच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Rahul sadolikar

Tanushree Dutta on Rakhi Sawant: नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाच्या आरोपामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता राखीवर निशाणा साधला आहे.

काही काळापूर्वी नाना पाटेकर यांनी चित्रपटाच्या सेटवर आपला विनयभंग केला अशी तक्रार तनुश्रीने केली आणि देशभरात मी टू ट्रेंड सुरू झाला.

तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर कित्येक महिलांनी त्यांच्या आयुष्यातही असाच अनुभव आला होता असं सांगत देशभरात मी टू चळवळ सुरू केली होती.

राखी - आदिलचा वाद

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून जोरदार भांडण सुरू आहे. राखी आणि आदिल रोज एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. या वादामुळे आदिलला तुरुंगातही जावे लागले. 

तनुश्री - राखीचा वाद

मात्र आता अभिनेत्री तनुश्री दत्तानेही या प्रकरणात उडी घेतली आहे. तनुश्री दत्ता 2018 मध्ये MeToo चळवळीत खूप सक्रिय होती आणि तिने नाना पाटेकर यांच्यावरही अनेक आरोप केले होते. मात्र आता त् राखी सावंतविरोधात टीका करायला सुरूवात केली आहे. 

तनुश्री दत्ताने राखी सावंतसाठी अश्लील शब्दही वापरले. तनुश्री दत्ताने राखी सावंतला इंडस्ट्रीतील लोकांनी तिच्या विरोधात टीका करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचंही म्हटलं आहे.

तनुश्रीवर राखीचे आरोप

MeToo चळवळीदरम्यान राखी सावंतने तनुश्री दत्तावर अनेक गंभीर आरोप केले होते आणि काही व्हिडिओही बनवले होते, अशी माहिती आहे. राखी सावंतने तनुश्री दत्ता ही लेस्बियन असून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा दावाही केला होता. 

तनुश्री दत्ता तिला रेव्ह पार्ट्यांमध्ये घेऊन जायची, असेही राखीने म्हटले होते. त्यानंतर तनुश्री दत्ताने आपली बाजू मांडली होती. आणि आता तो पुन्हा एकदा मैदानात उतरली असून, तिनेही राखीवर गंभीर आरोप केले आहेत.

तनुश्री म्हणाली

मला संपूर्ण देशाला सांगायचे आहे की राखी मनोरुग्ण आणि लबाड आहे. माझ्या चारित्र्याबद्दल ती काही बोलली ते सर्व काही खोटे होते. 

आज मला संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला किंवा तिचे नाव माहीत असलेल्या कोणालाही सांगायचे आहे की ती खूप खोटी आहे. ती दर पाच मिनिटांनी खोटे बोलते. तिची पातळी इतकी खालावली आहे की तिच्या पातळीवर जाऊन ती पुढे काय करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

राखी सावंतला पैसे मिळतात

राखी सावंत ही बॉलीवूडमधील एक साईड कॅरेक्टर आहे, जी विनाकारण इतरांच्या मुद्द्यांमध्ये अडकते आणि स्वतःच गोंधळ घालायला लागते. बॉलीवूडमध्ये असे अनेक गुंड आहेत जे सर्व चुकीच्या गोष्टी करतात. 

ते वाईट काम करतात, राखी सावंतसारख्या एक-दोन जणांना ते सांभाळुन ठेवतात. काही चुकले तर ते राखीला कॉल करतात. मग ते तिला पैसे देतात आणि मग राखी सक्रिय होते.

राखी तिच्यापेक्षा लहान मुलींवर अत्याचार करते

तनुश्री राखीवर आरोप करताना म्हणते "ती तिच्यापेक्षा लहान मुला-मुलींवर अत्याचार करते. राखी सुपारी घेते. तिने माझी बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे. राखीचे गटारीचे तोंड आहे". 

तनुश्री दत्ताने सांगितले की, राखी सावंतला तिच्या नावाने इंडस्ट्रीतील काही लोकांनी सुपारी दिली आहे.

तनश्री पुढे म्हणाली

तनुश्री म्हणाली की राखी सावंत काहीही करू शकते. तिच्यात मान, प्रतिष्ठा, नम्रता, लाज असे काहीही नाही. ज्याला आदर आहे त्यालाच सन्मान दिला जातो. 

ज्याला आदर नाही त्याला काही फरक पडणार नाही. राखी सावंतला काही मानसिक आजार आहे. तिने मला ज्या गोष्टी सांगितल्या त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. 

मला धक्का बसला होता. तिच्या पाच लग्नांवरही मला शंका आहे. तिला पुरुषांमध्ये रस नाही. ती लोकांवर आरोप करत राहते. ती खोटे बोलते आणि बैलासारखी अंगावर धावुन येते.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT